Nashik News : मालेगावी जुन्या ऑईलची दररोज हजारोंची उलाढाल; खराब आईलची 20 लिटरने खरेदी

Nashik : मालेगावी चारचाकी, ट्रक, दुचाकी यांची गॅरेची संख्या मोठी आहे. येथील कारागीर स्वस्तात दर्जेदार काम करून देत असल्याने कसमादे परिसरातील वाहनांच्या सर्व्हिसिंग ग्राहक हमखास येथे येतात.
oil
oilesakal

Nashik News : मालेगावी चारचाकी, ट्रक, दुचाकी यांची गॅरेची संख्या मोठी आहे. येथील कारागीर स्वस्तात दर्जेदार काम करून देत असल्याने कसमादे परिसरातील वाहनांच्या सर्व्हिसिंग ग्राहक हमखास येथे येतात. चारचाकी वाहनांतून खराब झालेले ऑइल बदलले जातात. जुने ऑइल शहरातील अनेक विक्रेते २० रुपये लिटरने गोळा करतात. रोज येथील शालीमार, मोसमपूल, स्टार हॉटेल, चाळीसगाव चौफुली, शिवतीर्थ, कुसुंबा रोड यासह विविध भागात दुचाकी व चारचाकी वाहने दुरुस्त केली जातात. ( Daily turnover of thousands of old oil in Malegaon )

या वाहनातून वाहनचालक खराब झालेले ऑइल काढून घेतात. या ऑईलमधून रोज हजारांची उलाढाल होते. रोज सुमारे ४०० ते ५०० लिटर ऑइल येथील गॅरेजमधून जमा केले जाते. सर्वात जास्त ट्रक, जेसीबी, दहा टायर, डम्पर, ट्रॅक्टर, कार या वाहनांची सर्व्हिसिंग करताना आईल मोठ्या प्रमाणावर निघते. एका गॅरेजवर आठवड्यातून सुमारे ५० ते ६० लिटर ऑइल जमा होते.

काही गॅरेजचालक मोठा ड्रम भरुन ठेवतात. वर्षातून चांगला भाव मिळाल्यास विकतात. शहरात दहा ते बारा व्यावसायिक आईल गोळा करण्याचे काम करत असतात. मालेगाव बरोबरच येथील व्यापारी कळवण, देवळा, सटाणा, धुळे, येवला, मनमाड, नांदगाव, नामपूर, ताहराबाद यासह विविध भागातून ऑइल जमा केले जाते. येथे दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनातूनही काही प्रमाणात ऑइल मिळते.(latest marathi news)

oil
Nashik News : नाशिक शहरातील 155 मांस विक्रेत्यावर कारवाई! भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी मोहीम

जुन्या आईलचा वापर

जुने ऑइल ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत जाते तसेच सेंट्रींग कारागीर मोठ्या प्रमाणात हे ऑइल विकत घेतात. घराचे व मोठ्या इमारतीचे स्लॅब व बीम भरताना प्लेट व फळ्यांना आईल लावले जाते. त्यामुळे सतत मागणी असते.

''गॅरेजवर जुने ऑइल घेण्यासाठी काही व्यापारी येतात. शहराबरोबरच ग्रामीण भागातून सेंट्रींग कारागीर ऑइल घेण्यासाठी येत असतात. २० रुपये लिटरने ऑईलची विक्री होते.''- सुफियान शेख, गॅरेज संचालक, दरेगाव

oil
Nashik News : खिरमाणी फाट्यावर 'द बर्निग' बसचा थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com