Nashik Damage Road: साहेब, आता तरी माझ्याकडे बघा हो...! चिचोंडी रस्त्याची आर्त हाक

Big potholes lying on Yewla road
Big potholes lying on Yewla roadesakal

चिचोंडी : एमआयडीसीचे गाव ळख असलेल्या चिचोंडीला जाणारा रस्ता सध्या अखेरची घटका मोजत असून, या रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता आता जणू काही ‘साहेब, आता तरी माझ्याकडे बघा हो’, अशी हाक देत आहे.

१८ वर्षांपूर्वी छगन भुजबळ निवडून आले आणि येवला तालुक्यातील रस्त्यांचा विकास झपाट्याने सुरू झाला. त्याचवेळी येवला-चिचोंडी रस्त्याचे डांबरीकरण झाले.

आता १८ वर्षे होऊनही रस्त्याचे खड्डे बुजविण्याची तसदी जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेतल्याने हा रस्त्याची दुरवस्था खूपच भयंकर झाली आहे. (Nashik Damage Road Chichondi road Demand for filling potholes by temporary asphalting)\

रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचे टायर फुटणे, ऑइल लीकेज होणे, चेंबर फुटणे, रस्त्यातच वाहन ना दुरुस्त होणे, असे प्रकार घडत आहेत. छोटे-मोठे अपघातही नित्याचे झाले आहेत.

अनेकदा येवला-महालखेडा ही बस येवल्याकडे जाताना प्रवासी नसेल, तर खड्डे चुकविण्यासाठी व्हाया रायते अशी येवला जाते. येवला शहराशी जोडणारा या परिसरातील चिचोंडी खुर्द, चिचोंडी बुद्रुक, साताळी, भिंगारे, महालखेडा या गावांचा हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

Big potholes lying on Yewla road
Pulses Rate Hike : महागलेल्‍या डाळींनी बिघडविले गृहिणींचे गणित; दोन महिन्‍यांमध्ये 20 टक्क्‍यांपर्यंत दरवाढ

या परिसरातील लोक भुजबळ संपर्क कार्यालयात अनेकदा निवेदन घेऊन गेले. त्यावेळी त्यांना संबंधित रस्ता जिल्हा परिषदेकडून पीडब्ल्यूडी खात्याकडे वर्ग करण्यात आल्याचे भुजबळ संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, आता येवला तालुक्याचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना कॅबिनेटमंत्री पदाचा दर्जा असल्याने रस्त्याचे लवकर रुंदीकरण होऊन डांबरीकरण व्हावे, याकडे परिसरातील नागरिक आस लावून बसले आहे.

"चिचोंडी-येवला रस्त्याचे १८ वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले. त्यानंतर या रस्त्याला कधी खडी पडली ना कधी मुरूम. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ व रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. रस्त्याचे त्वरित रुंदीकरण होऊन डांबरीकरण व्हावे."

-चेतन पळे, रहिवासी, चिचोंडी खुर्द

Big potholes lying on Yewla road
Nashik: नातेवाइकांच्या भेटीने पाणावले बंदिवानांचे डोळे; भावपूर्ण गळाभेट कार्यक्रमात अधिकारीही भावुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com