Scholarship News : पुणे विद्यापीठ शिष्यवृत्तीच्‍या अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

Scholarship Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती, अर्थसाहाय्य योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Scholarship Exam
Scholarship ExamSakal

Scholarship News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती, अर्थसाहाय्य योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) लाभासाठी सोमवार (ता.११) पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात पुणे विद्यापीठाने सूचनापत्रक जारी केलेले आहे. (nashik Pune University Scholarship marathi news)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या संलग्न महाविद्यालय, विद्यापीठ विभागातील पदवी, पदव्‍युत्तर अव्‍यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्‍या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती, अर्थसहाय्यक योजना सुरु आहे. (latest marathi news)

Scholarship Exam
Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बुधवार (ता. ६) पर्यंत मुदत होती. या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्‍यानुसार अर्ज न केलेल्‍या विद्यार्थ्यांना योजनेच्‍या लाभासाठी येत्‍या सोमवार (ता.११) पर्यंत अर्ज करायचा आहे.

महाविद्यालय, विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्‍या अर्जाची छाननी करून आपल्‍या महाविद्यालयाच्‍या लॉगइनद्वारे १३ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठास सादर करायची आहे. यापुढे कुठल्‍याही स्वरूपात मुदतवाढ दिली जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

Scholarship Exam
Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला ; पाचवीला २१,५४० तर आठवीसाठी १८ हजार ४६१ विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com