Saptashringi Devi : सप्तशृंगी मंदीरात 800 किलो द्राक्षांची सजावट

Saptashringi Devi : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ८०० किलो द्राक्ष व १०० किलो झेंडूच्या फुलांपासून आकर्षक तोरण व झुंबर बनवून मंदिराची सजावट करण्यात आली.
Shree Bhagwati Temple has an attractive decoration made of grapes and a reassuring idol of Shree Bhagwati.
Shree Bhagwati Temple has an attractive decoration made of grapes and a reassuring idol of Shree Bhagwati.esakal

Saptashringi Devi : आद्य स्वंयभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर शुक्रवारी (ता.२३) आदिमाया सप्तशृंगी मातेच्या मंदिरात ८०० किलो द्राक्ष व १०० किलो झेंडूच्या फुलांपासून आकर्षक तोरण व झुंबर बनवून मंदिराची सजावट करण्यात आली. आदिमाया सप्तशृंगी मंदिरात देवीचरणी नवसपूर्ती म्हणून शेतातील पीक अर्पण करण्याची प्रथा देवीच्या मंदिरात सुरु झाली असून त्याला भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ()

शुक्रवारी ओझर येथील बाळासाहेब गडाख यांनी आदिमायेच्या चरणी २० कॅरेट काळी द्राक्ष, २० कॅरेट हिरवी द्राक्ष अशी ८०० किलो द्राक्ष व १० कॅरेट झेंडूची फुले अर्पण केली. त्यानंतर सजावटकार शंकरराव जुन्नरे यांनी पाच ते सहा सहकाऱ्यांच्या मदतीने द्राक्षांचे तोरणांने मंदिराच्या आतील मूर्तीच्या कमान तसेच झेंडूच्या फुलांचे झुंबराची सुंदर अशी सजावट करण्यात आली.

Shree Bhagwati Temple has an attractive decoration made of grapes and a reassuring idol of Shree Bhagwati.
Saptashrungi Devi Mandir News: सुरत येथील भाविकाचे आदिमाया सप्तशृंगीस 6 किलो चांदीचे दागिने अर्पण

दोन दिवस द्राक्षे आणि फुलांची सजावट ठेवण्यात येणार असून त्यानंतर चांगल्या स्थितीतील द्राक्षे भाविकांना भगवती प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार, प्रशांत निकम आदींसह पुरोहित संघ व कर्मचारीवृंद यांनी सजावटीसाठी सहकार्य लाभले. (latest marathi news)

Shree Bhagwati Temple has an attractive decoration made of grapes and a reassuring idol of Shree Bhagwati.
Saptashringi Devi Gad : सप्तशृंगीमातेचे मंदिर 31 डिसेंबरला 24 तास खुले राहणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com