Nashik Ajit Pawar Daura : सरकार आदिवासींच्या पाठीशी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar News : श्री. पवार यांच्या हस्ते ९१९ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते.
Tribal women and men present at the event of Deputy Chief Minister Ajit Pawar.
Tribal women and men present at the event of Deputy Chief Minister Ajit Pawar. esakal
Updated on

सुरगाणा : आदिवासी बांधवांनो, घाबरू नका, केंद्र व राज्य सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. संविधान कुणीही बदलू शकत नाही, तसा नारा लावणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरगाणा येथे शुक्रवारी (ता. २) सांगितले. श्री. पवार यांच्या हस्ते ९१९ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. (Nashik Deputy Chief Minister Ajit Pawar saura at surgana statement Govt stands by tribals marathi news)

मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. कधी सरकारमध्ये, तर कधी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी मी झगडणारा आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघात २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत.

राज्य दिवाळखोरीत काढले, असा आरोप होतोय, पण व्यवहार मलाही कळतो. लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत, हे कदापि होणार नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे, गैरसमज व फसवेगिरी करणार नाही. (latest marathi news)

Tribal women and men present at the event of Deputy Chief Minister Ajit Pawar.
Ajit Pawar : आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास ; अजित पवार,अन्यथा वेषांतराचे आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावे

आदिती तटकरे यांनी तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायच्या आहेत. पर्यटनस्थळ निर्माण केले जाणार असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. लाडकी बहीण योजनेत अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे. नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांचीही भाषणे झाली.

Tribal women and men present at the event of Deputy Chief Minister Ajit Pawar.
Sachin waze: जयंत पाटील अडकणार? सचिन वाझेंनी नाव घेतल्यामुळे नवा ट्विस्ट; फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com