Nashik News : पोलिसाने घातली गणवेशावर स्पोर्ट्स कॅप; उपायुक्तांनी दिला दणका

Nashik : बंदोबस्तावर असताना पोलिस अंमलदार गणवेशावरील टोपी विसरला असता, त्याने वेळ मारून नेण्यासाठी स्पोर्ट्स कॅप’ घालणे त्यास चांगलेच महाग पडले आहे.
police
policeesakal

Nashik News : बंदोबस्तावर असताना पोलिस अंमलदार गणवेशावरील टोपी विसरला असता, त्याने वेळ मारून नेण्यासाठी स्पोर्ट्स कॅप’ घालणे त्यास चांगलेच महाग पडले आहे. उपायुक्तांनी थेट नियमांचे उल्लंघन केल्याने लेखी नोटीस बजावत सक्त ताकीद दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ( Deputy Commissioner gave notice due to Sports cap on police uniform )

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस अंमलदार-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तासाठी हजर होते. त्यावेळी एक पोलिस अंमलदार कर्तव्यावर असताना खाकी वर्दीत होता. परंतु त्याच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची स्पोर्ट्स कॅप घातलेली होती.

ही बाब त्याठिकाणी उपस्थित पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आल्याने, त्यांनी पोलिस अंमलदारास जाब विचारला असता, त्याने टोपी विसरल्याचे सांगितले. ही बाब गंभीरपणे घेत अंमलदाराने कर्तव्यात कसूर केल्याने उपायुक्तांनी लेखी स्वरूपात सक्त ताकीदची नोटीस बजावत त्याच्यावर कारवाई केली.

police
Nashik News : गंगापूर धरणात दूषित पाण्यामुळे प्रदूषण! नाशिककरांच्या आरोग्यास धोका; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

गस्ती पथकालाही दणका

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पीटर मोबाईल वाहन गस्त करते. गस्तीवर असताना या वाहनावरील डोम लाइट नियमित सुरू असावा लागतो. काही दिवसांपूर्वी शहरातील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘पीटर मोबाइल’ची गस्त सुरू असताना, त्या वाहनावर कर्तव्यावरील चालक श्रेणी उपनिरीक्षकाने वाहनाचा डोम लाइट बंद ठेवला होता.

ही बाब हद्दीत गस्तीवर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेरली आणि जाब विचारला. त्यावेळी चालक उपनिरीक्षकाने वाहन वळवून लावल्याने डोम लाइट बंद केल्याचे सांगितले. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालक उपनिरीक्षकास लेखी स्वरूपात सक्त ताकीद देत कारवाई केली आहे.

police
Nashik News : मालेगावात 500 कोटीचे व्यवहार ठप्प! बाजार समितीचे 50 लाखांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com