Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा निवडणूक लढविणार नाही : रहेमानी

Lok Sabha Election 2024 : राजकीय कामकाजामुळे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कामात अडथळा निर्माण व्हायला नको यासाठी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे रहेमानी यांनी स्पष्ट केले.
Maulana Umren Mehfuz Rahmani
Maulana Umren Mehfuz Rahmaniesakal

मालेगाव : देशात जातीयवादाचे विष पेरले जात असून द्वेष वाढत आहे. जबाबदारीच्या पदावर असलेल्या मान्यवरांसह लोकप्रतिनिधी देखील बेलगाम वक्तव्य करीत आहेत. तथापि, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कामाचा व्याप पाहता धुळे लोकसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव व प्रमुख धर्मगुरु मौलाना उम्रेन मेहफुज रहेमानी यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. (nashik Dhule Lok Sabha Election 2024)

मौलाना उम्रेन म्हणाले, मतदारांनी धर्मनिरपेक्षता व विकासाच्या पाठीशी रहावे. या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी यासाठी पाठींबा दर्शविणाऱ्या आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख, समाजवादी पक्षाचे मुश्‍तकीम डिग्निटी, एमआयएमचे डॉ. खालीद परवेज यांच्यासह पाठबळ देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.

धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षांकडूनही अपेक्षाभंग झाला आहे. मुस्लीम धर्म (कौम) फक्त जनाजा उचलणारा धर्म असल्याची भावना विविध राजकीय पक्षांची झाली आहे. ती गैर आहे. सर्व समाज, सर्व धर्मांना समवेत घेऊन काम केल्यासच देशाचा विकास होवू शकेल.

या निवडणुकीत आपण उमेदवारी करावी अशा अनेकांच्या भावना होत्या. याउलट आपली उमेदवारी व निवडणुकीतील विजय अनेकांना खयाली पुलावा वाटत होता. मात्र, उमेदवारांची संख्या व राजकारणातील खिचडी पाहता खयाली पुलावा केव्हा तयार होइल याचा भरोसा नाही.

तथापि प्रत्येक पाऊल विचार करुन टाकले पाहिजे. आपल्यावर प्रेम करणारे शहरवासियांनी ही चर्चा सुरु केली. यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपल्याला विचारणा केली. नागरिकांनी तन, मन, धनाने साथ देण्याचे मान्य केले. काहींनी अपक्ष निवडणूक लढविण्याची सूचना केली. काहींनी एमआयएमची उमेदवारी करावी, अशी सूचना केली.  (latest marathi news)

Maulana Umren Mehfuz Rahmani
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेतील प्रचाराच्या बदल्यात विधानसभेचे ‘कमिटमेंट’!

एकंदर परिस्थितीचा विचारविनिमय केल्यानंतर व सर्व समाजघटकांशी चर्चा केल्यानंतर राजकीय कामकाजामुळे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कामात अडथळा निर्माण व्हायला नको यासाठी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे रहेमानी यांनी स्पष्ट केले.

त्याचवेळी शहरातील सर्व समाजधुरिणांनी, मान्यवरांनी एकत्र येवून दबावगट स्थापन करावा. या गटाच्या माध्यमातून शहरातील समस्या व विकासाचे प्रश्‍न मार्गी लागावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. घरात बसून राहण्यापेक्षा धर्मकार्य व समाज कार्यात हिरारीने भाग घ्या असे आवाहन त्यांनी केले.

मजलीसे इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एमआयएम) सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील दौऱ्यात येथील एमआयएमचे डॉ. खालीद परवेज यांच्याशी चर्चा करुन मौलाना उम्रेन मेहफुज रहेमानी यांनी एमआयएमतर्फे निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर शहरात सोशल मिडीयावर या संदर्भात जोरदार चर्चा सुरु झाली होती.

डॉ. खालीद परवेज यांनी देखील मौलाना उम्रेन यांच्या सारख्या धर्मगुरुंनी राजकारणात आल्यास त्यांचे स्वागत असेल असे मत व्यक्त केले होते. यानंतर मौलाना उम्रेन यांच्या खानका मदरसामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत त्यांना पाठिंबा दर्शवून निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले होते. गेल्या दोन आठवड्यापासून हे नाट्य सुरु होते. मौलाना उम्रेन यांच्या स्पष्टीकरणानंतर या नाट्यावर पडदा पडला आहे.

Maulana Umren Mehfuz Rahmani
Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीची आज बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com