Nashik News : शिक्षकांची फरक बिले सेवाज्येष्ठतेने द्यावीत

Nashik News : नाशिक पंचायत समितीतील शिक्षण विभागात निवडश्रेणी पात्र शिक्षकांच्या वेतन निश्चितीनंतर फरक बिले काढण्याचे काम सुरू आहे.
Teacher
Teacher esakal

Nashik News : नाशिक पंचायत समितीतील शिक्षण विभागात निवडश्रेणी पात्र शिक्षकांच्या वेतन निश्चितीनंतर फरक बिले काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून यात अनियमता केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नाशिक तालुका संघटनेने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. (Nashik News)

यात, पात्र शिक्षकांची बिले एकाच वेळी अथवा सेवाज्येष्ठतेने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत, संघटनेने निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित शिक्षकांस निवडश्रेणी देण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. त्या अनुषगांने सर्व गटस्तरावर वेतननिश्चिती व फरक बिले काढण्याचे कामे निवडश्रेणी आदेशान्वये सुरू आहे.

सदरची यादी मंजूर करताना सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्याप्रमाणे तालुकास्तरावर पात्र शिक्षकांची वेतन निश्चिती व फरक बिले मंजूर व अदा करण्याचे काम सेवाज्येष्ठतेने क्रमवारी होणे अपेक्षित आहे. (latest marathi news)

Teacher
Nashik Parking Problem : ‘नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग; कोंडीची समस्या जैसे थे

मात्र, नाशिक गटातील सदर फरक बिले काढण्यात विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अनियमितता केली जात आहे. ठराविक १० शिक्षकांची बिले विभागातून काढण्यात आली. या प्रकारामुळे सर्वसामान्य शिक्षकांवर अन्याय होत आहे.

त्यासाठी पात्र शिक्षकांची बिले एकाचवेळी अथवा सेवाज्येष्ठतेने द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष विवेक खैरनार, कार्याध्यक्ष प्रल्हाद भालेकर, कोशाध्यक्ष प्रल्हाद भामरे, कार्यवाह स्वप्नील भोसले आदींच्या सह्या आहेत.

Teacher
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com