Dindori Lok Sabha Constituency : यंदा सव्वालाख मतदार वाढल्याने लढतीत रंगत; मतदारसंघात 18 लाख 53 हजार मतदार

Lok Sabha Constituency : २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६५.६५ टक्के मतदान झाले. पाच वर्षात मतदारांच्या संख्येत एक लाख २० हजारांनी वाढ झाली आहे.
voters
voters esakal

Nashik News : अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा दोन उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६५.६५ टक्के मतदान झाले. पाच वर्षात मतदारांच्या संख्येत एक लाख २० हजारांनी वाढ झाली आहे. वाढीव मतदान आणि दोन उमेदवारांमध्ये होणारी सरळ लढत याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा दहा उमेदवार रिंगणात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार होते. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप व वंचित बहुजन आघाडी यांच्यात मतांचे विभाजन झाले. यंदा मतांचे विभाजन होण्याची शक्यता अत्यंत कमी दिसून येते. आदिवासी मतदारांची संख्या साडेसात लाखांवर आहे.

त्यातही कोकणा, महादेव कोळी, भिल्ल, वार्ली आदींचे प्राबल्य आहे. त्यापाठोपाठ ओबीसी, मराठा, अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मतदारसंघ आदिवासी बहुल असला तरी खुल्या प्रवर्गातील मतदारांचा प्रभाव अधिक असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचा कौल आजमावणाऱ्या या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली.

निर्मितीपासून भाजपचा वरचष्मा राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.भारती पवार यांना नांदगाव आणि चांदवड-देवळा या विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळाले. तर धनराज महाले यांना दिंडोरी व येवला मतदारसंघातून बढत मिळाली पण, त्यांना विजयापर्यंत घेवून जाण्यात अपयशी ठरली.

विशेष म्हणजे, माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांना २०१९ च्या निवडणुकीत एक लाखांवर मते मिळाली होती. यंदा त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात उतरवलेला दिसत असला तरी त्यांचा कितपत प्रभाव पडेल हाच मुद्दा आहे. (latest marathi news)

voters
Dindori Lok Sabha Constituency : हरिश्चंद्र चव्हाणाचं बंड झालं थंड; फडणवीसांच्या शिष्टाईने दिंडोरीतून माघार

मत विभाजन टळणार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व माकप असे तीन तुल्यबळ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले होते. यंदा थेट दुरंगी लढत रंगत असल्याने मत विभाजन होणार नसून सरळ सामना रंगणार आहे.

२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

डॉ.भारती पवार : ५६७४७०

धनराज महाले : ३६८६९१

जे. पी. गावित : १०९५७०

बापु बर्डे : ५८८४७

२०१९ : १७ लाख ३२ हजार ९३६

२०२४ : १८ लाख ५३ हजार ३८७

२०१९ च्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभेचे चित्र

उमेदवार.............नांदगाव.....कळवण....चांदवड.....येवला......निफाड.....दिंडोरी

डॉ.भारती पवार...११५३३६...६५५४५.....१२०७०३...९५७०९....९३७६३...७४३९६

धनराज महाले...४०४२५....६०१८०.....४००८४....६७५८९......५८०१९...१०१८१४

जे. पी. गावित.....४१९२......५८२२७......७०११......२४६५.......३१७७.....३४४१३

बापू बर्डे............१५४४६.....३६३६........१००४८......१०८३३....१०६०१...८१८५

voters
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीत माजी आमदार गावित, माजी खासदार चव्हाणांची माघार; माघारीनंतर 10 उमेदवार रिंगणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com