Dindori Lok Sabha Constituency : जिल्ह्यात माकप, भाकप विभागली 2 गटात; माकपची दिंडोरीत उमेदवारी

Lok Sabha Constituency : इंडिया आघाडीत कम्युनिष्ट पक्ष सहभागी झालेले असताना नाशिक जिल्ह्यात मात्र, भारतीय कम्युनिष्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष दोन गटात विभागला गेला आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal

Dindori Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधातील इंडिया आघाडीत कम्युनिष्ट पक्ष सहभागी झालेले असताना नाशिक जिल्ह्यात मात्र, भारतीय कम्युनिष्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे जे. पी. गावित हे उमेदवारी करत रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाकपने महाविकास आघाडीसमवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ( district CPM and CPI are divided into 2 groups )

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हटविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात इंडिया आघाडी एकत्र आली आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकात एकत्र आलेल्या पक्षाची एकजुठ दिसून आली आहे. इंडियाच्या धर्तीवर, राज्यातही महाविकास आघाडी एकत्र आली असून, लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे.

महाविकासच्या झालेल्या पत्रकार परिषदेत माकप, भाकपसह सर्व डावे पक्ष आमच्यासोबत असल्याचे नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून, महाविकास आघाडीत फूट पडली आहे. महाविकाच्या जागा वाटपात दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाला गेलेली असताना माकपला सोडावा अशी मागणी माकपचे गावित यांनी केली आहे.  (Nashik Political News)

Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha: सरकारला लाल कांद्याची नव्हे; पांढऱ्या कांद्याची चिंता! रॅलीद्वारे भास्कर भगरे यांनी दिंडोरीतून दाखल केला अर्ज

मात्र, दिंडोरीत राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने विधानसभा निवडणुकीत, सन्मान राखला जाईल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र, गावित यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळत, २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे उमेदवारी करीत आहे. आमची उमेदवारी इंडिया आघाडीकडून आहे, आम्ही माघार घेणार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची माघार घ्यावी असे जे. पी. गावित यांनी यावेळी सांगितले. मात्र, या उमेदवारीवरून आता जिल्ह्यातील माकप आणि भाकप हे दोन पक्ष दोन गटात विभागले गेले आहेत. माकप स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेली असली तर, भाकपने महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीच्या नाशिक व दिंडोरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत भाकपचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

''भाजपच्या पराभवासाठी देशव्यापी मोहिम कम्युनिष्ट पक्षाने हाती घेतली आहे. त्यासाठी इंडिया आघाडीत पक्ष सहभागी झाले आहेत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करणार. नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात पक्षाच्या आदेशाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाकपने पाठींबा दिला आहे. त्या उमेदवारांसाठी काम करणार आहे.''- राजू देसले, राज्य सहसचिव, भाकप

Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात एकमेव महिलेने घातली खासदारकीला गवसणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com