Dindori Lok Sabha Election 2024 Result : शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्याची गरुडझेप

Nashik News : भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा सामान्य शिक्षक असलेल्या व राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून भास्कर भगरे यांनी दारुण पराभव केला.
bhaskar bhagre
bhaskar bhagre esakal

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार व पहिल्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा सामान्य शिक्षक असलेल्या व राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून भास्कर भगरे यांनी दारुण पराभव केला. मतदारराजाने त्यांना गल्लीतून दिल्लीत पोहचविले. (Dindori Lok Sabha Election 2024 Result)

दिंडोरी तालुक्यातील जेमतेम १४५ कुटुंब असलेल्या गोंडेगाव येथील मुरलीधर भगरे या आदिवासी शेतमजुराच्या मुलाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. पुढे नोकरी करत असतानाच समाजसेवेचे व्रत हाती घेतले. सरपंच म्हणून काम करत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिंडोरीचे नेते श्रीराम शेटे यांच्या विचाराने प्रेरित होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होत पुढे पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती.

जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती संचालक म्हणून काम करीत असतानाच शरद पवारांशी निष्ठा कायम ठेवत थेट दिंडोरी लोकसभेची उमेदवारी मिळवली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना आव्हान देण्यात यशस्वी ठरलेले भास्कर भगरे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा असून, राजकारणाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे समाजकार्य करण्याचे अन् निष्ठेचे फळ काय असते, हे भगरे यांच्या विजयाने सिद्ध केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतमजूर मुरलीधर व जयवंताबाई भगरे यांची चार मुले. त्यातील भास्कर हे दुसरे पुत्र. मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या भगरे दांपत्य यांनी आपल्या सर्व मुलांना गावातील प्राथमिक शाळेत शिक्षणास टाकले. त्यांचे मोठे बंधू संपतराव हे एचएएलमध्ये नोकरीस लागले. भास्कर भगरे यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गोंडेगाव जिल्हा परिषद शाळेत, तर पाचवी ते सातवीचे शिक्षर मुखेड जिल्हा परिषद शाळेत झाले. (latest marathi news)

bhaskar bhagre
Dindori Lok Sabha Election 2024 Result : तिसरी नापास ‘सरांना’ 1 लाख मतांचे दान!

पुढे मुखेडमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दररोज गोंडेगाव ते मुखेड पायपीट करीत त्यांनी शिक्षण घेतले. नंतर नांदगाव येथे डीएड करीत मास्तर होण्याचे स्वप्न बघितले पण त्यांना अजून उच्च शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी पिंपळगाव कॉलेजला पदवी पूर्ण करीत केटीएचएम महाविद्यालयामधून एमए पूर्ण केले. संगमनेरला बी.एड. केले. त्यांचे मास्तर होण्याचे स्वप्न पूर्ण होत ते पिंपळगाव बसवंत येथे कै. मा. ल. जाधव कन्या विद्यालयात उपशिक्षक म्हणून नोकरीस लागले.

सरपंच ते खासदारकीचा प्रवास

भरस्कर भगरे यांना ग्रामस्थांनी २००५ साली गोंडेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून दिले. त्यांनी आपल्या कामातून गावचा सर्वांगीण विकास साधत गावाला थेट राष्ट्रपती पारितोषिक मिळवून दिले. २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत शेटे यांनी त्यांचे गावाचे अल्प मतदान असताना त्यांना खेडगाव गणातून थेट पंचायत समिती निवडणूक लढविण्याची संधी दिली. त्यात ते निवडून आले.

पुढे सभापती होण्याची संधी मिळाली. २०१७ ला त्यांना खेडगाव जि. प. गटातून संधी दिली. मात्र, माजी आमदार धनराज महाले यांच्याकडून ते पराभूत झाले. मात्र, त्यांनी जनसंपर्क तोडला नाही. पुढे महाले यांनी लोकसभा लढविण्यासाठी राजीनामा दिल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या घोळात त्यांना पक्षाचा एबी फॉर्म वेळेत मिळाला नाही. पण, ते अपक्ष म्हणून लढले व मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता ते खासदार झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्याचा हा विजय असल्याची भावना सामान्यांमध्ये आहे.

bhaskar bhagre
Dindori Lok Sabha Constituency : कांदा निर्यातबंदी दोष; उत्पादकांचा मतदानातून रोष! डॉ. भारती पवारांना नडला बळीराजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com