Nashik News : आधी चटका आता गारवा! बदलत्या वातावरणामुळे बळावताहेत आजार

Nashik : ‘मे’च्या सुरवातीला उन्हाचा चांगलाच चटका नाशिककरांनी अनुभला, मात्र गेल्या आठवड्यापासून वातारणात बदल झाला अन् थेट बेमोसमी पाऊस शहरात बरसला.
Diseases
Diseases esakal

Nashik News : ‘मे’च्या सुरवातीला उन्हाचा चांगलाच चटका नाशिककरांनी अनुभला, मात्र गेल्या आठवड्यापासून वातारणात बदल झाला अन् थेट बेमोसमी पाऊस शहरात बरसला. पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा आला असला तरी यामुळे टाईफाईड, कावीळ, व्हायरल इन्फेक्शनसारखे आजार बळावत आहेत. त्यामुळे बदलेल्या वातावरणात नागरिकांनी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. ( Diseases on rise due to climate change in city )

संतुलित आहार घ्या

वातारवणातील बदलातून अनेक आजार पसरतात. वातावरणात अचानक झालेले बदल शरीराला स्वीकारण्यास काही काळ लागतो. यातून प्रतिकारशक्ती कमी असल्यास लवकर इन्फेक्शन होते. प्रामुख्याने अन्न पाण्यातून आजार बळावतात. व्हायरल इन्फेक्शन, इन्फ्लुएन्झा सारख्या आजारांचा धोका संभावतो. निरोगी आरोग्यासाठी त्यामुळे आपला आहार संतुलित असला पाहिजे. शिजवलेले अन्न खायला हवे तर जंकफूड टाळावे. यामुळे पोटाचे आजार होत नाहीत. तसेच योगा, प्राणायाम, व्यायामाच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढवावी. (latest marathi news)

Diseases
Nashik News : अजंगला 8 वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू; गावात तणावाचे वातावरण

शुद्ध पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता भासते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यायले हवे असे आरोग्य तज्ञ सांगतात. मात्र हे पाणी शुद्ध असायला हवे. अशुद्ध पाणी पिल्यास कॉलरा, कावीळ, अतिसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची शुद्धता तपासून पाहिली पाहिजे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी यात फरक आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी उकळून घेणे, तुरटीने फिरवणे, किंवा थेट आरओद्वारे पाणी शुद्ध करता येते.

या गोष्टींची घ्या काळजी

- संतुलित आहार घ्या

- शिजवलेले अन्न खा

- प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायामा नियमीत करा

- पुरेसे किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या

- पाणी उकळून गार करून प्यावे, पाण्यामध्ये तुरटी फिरवावी

''वातावरणातील बदलांमुळे व्हायरल इन्फेक्शन सारखे आजार बळावतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य आहार, शुद्ध पाणी आणि व्यायाम करावा.''- डॉ. नितीन बोरसे, पोट व यकृत विकार तज्ज्ञ.

Diseases
Nashik News : विरोधकांवर विनयभंगाचा गुन्हा होता होता राहिला! सत्ताधाऱ्यांना विरोधकांची मात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com