Nashik News : भंगार वाहनांमुळे पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या विद्रुपीकरणात भर

Nashik News : पिंपळगाव पोलिस ठाणे परिसरात जप्त केलेल्या जुनाट (भंगार) वाहनांची वर्षानुवर्षे विल्हेवाट न लावल्यामुळे परिसराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे.
Wrecked vehicles at police station.
Wrecked vehicles at police station.esakal

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलिस ठाणे परिसरात जप्त केलेल्या जुनाट (भंगार) वाहनांची वर्षानुवर्षे विल्हेवाट न लावल्यामुळे परिसराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. त्याकडे कानाडोळा केल्याने सामान्य नागरिकांमध्ये रोष असून, वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जुनाट वाहनांची विल्हेवाट लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. (Nashik Pimpalgaon Police Station marathi news)

पिंपळगाव पोलिस ठाण्यात विविध कारणांनी जप्त केलेली वाहने आणून ठेवली आहेत. पुढे कोणतीही कारवाई होत नसल्याने ही वाहने कार्यालयांच्या परिसरात भंगारात निघाली आहेत. वर्षानुवर्षांपासून पोलिस ठाण्यांचा परिसर दुचाकी, चारचाकी वाहनांनी व्यापला आहे. नागरिकांचे स्वागत भंगारात निघालेल्या वाहनांनी होते.

एकीकडे सरकार विविध कार्यालये स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी मोठमोठे उपक्रम हाती घेत आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्याचा परिसर स्वच्छतेकडे कानाडोळा झाला आहे. सध्या पोलिस ठाण्याचा परिसर उभ्या असलेल्या वाहनांनी विद्रूप झाला आहे. वाहनांची अवस्था बघता आता वाहने उचलताना हातामध्ये वाहनांचे सांगाडेच येतील, अशी परिस्थिती आहे.

या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, कुणीही याची दखल घेत नाही. तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांना जुनाट वाहने, तसेच भंगाराच्या साहित्यांनी व्यापले आहे. पोलिस ठाणे परिसर संवेदनशील असतो. येथे भंगार वाहने नसावीत. मात्र, प्रमुखांनी येथील स्वच्छतेकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे.

वाहने गंजली; तरीही कारवाईकडे दुर्लक्ष....

पोलिस ठाणे परिसरामध्ये सुमारे पंधरा वर्षांपासून वाहने लावण्यात आलेली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ही वाहने याठिकाणी लावण्यात आली आहे. असे असताना आता या वाहनांची अवस्था बघितल्यास वाहने झाडाझुडपांत वेढल्या गेली आहे. (Latest Marathi News)

Wrecked vehicles at police station.
Nashik News : अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नजन यांनी आदल्या दिवशीच दिली होती घटनेची ‘हिंट’

शासकीय कार्यालयातील भंगार वाहनांची वेळेत

विल्हेवाट न लावल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांना होतो. वाहनांची विल्हेवाट लावून कार्यालयांचा परिसर मोकळा करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान,तत्कालीन पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याला आठ वर्षापुर्वी भेट दिली असता जप्त वाहनाच्या लिलावाचे फर्मान सोडले होते.पण तो आदेश ही हवेत विरला.

"पोलिस ठाण्यात नागरिकांसोबत कामासाठी जावे लागते. येथील परिसरात उभी केलेली वाहने बघता कार्यालयाच्या परिसराचा चेहरामोहरा विद्रूप वाटतो. त्यामुळे या वाहनांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे."- संतोष गांगुर्डे, माजी ग्रामपंचायत सदस्य

"जप्त केलेल्या वाहनासंदर्भात वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविणार आहे. सूचना येताच वाहनांची विल्हेवाट लावण्यात येईल."- दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत

Wrecked vehicles at police station.
Nashik News : तपानंतरही बोगद्यातील वाहतूक कोंडी कायम! नागरिकांना रोजचा मनस्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com