नाशिक: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण निधी लवकरच उपलब्ध होणार असून, पुढील आठ ते दहा दिवसांत निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे कामांना तातडीने सुरुवात करावी, अशा सूचना राज्याच्या वित्त विभागाने जिल्हा नियोजन विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात किती निधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.