esakal | नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

बोलून बातमी शोधा

ndcc-bank-nashik.jpg
नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ
sakal_logo
By
भरत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : नाशिक एन.डी.डी.सी बँकेकडून शेतकऱ्यांना खरिपासाठी दिले जाणारे पिक कर्ज देण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करत असून, 31 मार्चपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पीककर्जाचे पुनर्गठन केल्यानंतर पंधरा दिवसात पुढील वर्षासाठी पिक कर्ज देणे बंधनकारक आहे.

शेतकरी मारताहेत सतत हेलपाटे

मात्र दीड महिन्या नंतरही नाशिक जिल्हा बँक शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे पिक कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांचे खरीपाची कामे लांबणीवर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कसबे सुकेणे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शासन व जिल्हा बँकेच्या आव्हानाला प्रतिसाद देत मार्चअखेर आपले जुने पिक कर्ज भरले व नवीन कर्जासाठी आता वाट पाहत आहे. बँकेकडे अनेक शेतकरी हेलपाटे देखील मारत आहे मात्र वरिष्ठांकडून अद्याप कोणत्याही सूचना नाही या सबबीखाली कसबे सुकेणे येथील जिल्हा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा: प्रमुख चिकित्सा पद्धतीला ‘आयुष’ दुय्यम का मानते? आयुर्वेद चिकित्सक संतापले

पोटाला चिमटा घेत शेतकऱ्यांनी पूर्वीचे कर्ज फेडले

मागील वर्षापासून शेतकऱ्यांना कोरोनाच्या धर्तीवर शेतीमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मागील वर्षी कोरोना बरोबरच वर्षभर अधून मधून पडणारा बेमोसमी पाऊस, गारपीट, पिकांना अल्प भाव या समस्यांवर मात करत प्रसंगी पोटाला चिमटा घेत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. आता पुनर्गठण केल्यानंतर नवीन कर्ज मिळेल ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती. या कर्जावरच आपल्याला खरिपासाठी शेतीची कामे करता येतील ही अपेक्षा बाळगून बँकेकडे अनेक शेतकरी वेळोवेळी कर्जासाठी हेलपाटे मारत आहे. मात्र बँकेकडून शेतकऱ्यांना कोणताही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी माजी सरपंच मधुकर भंडारे तथा नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्राद्वारे येथील समस्यांची जाणीव करून दिली आहे. पत्रावर येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

''शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जा वरच अवलंबून राहावे लागते सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून पिक कर्ज दिले जाते माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंतचे कर्ज फेडूनही नवीन पीक कर्ज देण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करत आहे.''

- नाना पाटील भंडारे, माजी सरपंच ,कसबे सुकेणे