युक्रेनमध्ये फसलेल्या विद्यार्थ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Suraj Mandhare
Suraj Mandhareesakal

नाशिक : युक्रेन (Ukraine) देशात अडकलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी (collector) सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी केले आहे.

रशिया (Russia) व युक्रेन यांच्यातील युद्धाचा फटका तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नाशिकचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये फसले आहेत. दोघेही विद्यार्थी युक्रेनला सुखरूप असल्याने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून माहिती दिली व जिल्हा प्रशासनाने राज्य व केंद्र (State and central Government) शासनाला युक्रेनमध्ये (Ukraine) फसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. देशातील नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने (Union Ministry of External) हेल्पलाईन्स कार्यान्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली टोल फ्री- १८००११८७९७, फोन ०११-२३०१२११३/२३०१४१०४/२३०१७९०५, फॅक्स ०११-२३०८८१२४, ई मेल situationroom@mea.gov.in यावर संपर्क साधावा, असे म्हटले आहे.

Suraj Mandhare
Hijab Controversy : दिल्लीच्या या शाळांमध्ये ड्रेस कोड लागू

''नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३- २३१७१५१ या दूरध्वनी क्रमांक किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ आणि ddmanashik@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा.'' - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

Suraj Mandhare
अभिमानास्पद ! देशाला मिळाला पहिला बोल्ट्झमन पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com