Nashik | जिल्‍ह्यात ५५ पॉझिटिव्‍ह, तर ५० कोरोनामुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Nashik | जिल्‍ह्यात ५५ पॉझिटिव्‍ह, तर ५० कोरोनामुक्‍त

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या पन्नासाहून अधिक राहते आहे. बुधवारी (ता.१७) जिल्‍ह्‍यातील ५५ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत तीनने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ४२८ बाधितांवर उपचार सुरु आहेत.जिल्‍ह्‍यातील कोरोना रुग्‍ण वाढीचा केंद्र आता पुन्‍हा नाशिक महापालिका क्षेत्र झालेले आहे. बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३५ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. तर नाशिक ग्रामीणमधील वीस रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केल्याची नोंद आहे. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व ग्रामीणमधील आहे. बऱ्याच दिवसांनंतर नाशिक शहरात कोरोनाचा बळी गेला.

हेही वाचा: नाशिक | दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सायंकाळी उशीरापर्यंत ९१७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ६८४, मालेगावचे १४०, तर महापालिका क्षेत्रातील ९३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९३२ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ९२८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील दोघांचा संशयितांमध्ये समावेश होता.

हेही वाचा: महामार्गावर चोरट्यांचा प्रताप; टेम्पोसह लांबवला 15 लाखांचा मद्देमाल

loading image
go to top