esakal | नामपूरला २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

police sub-Inspector arrested for taking bribe

२७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : येथील पोलीस दुरक्षेत्रातील प्रभारी पोलिस उपनिरीक्षक व झिरो पोलिस यांना २७ हजार रुपयांची लाच स्विकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. वायगाव (ता. बागलाण) येथील एकोणपन्नास वर्षीय नागरिकाच्या तक्रारीनंतर चोवीस तासात लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ( ता. १) रात्री उशिरापर्यंत जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे, (वय ३५) व काकडगाव येथील झिरो पोलिस रमेश कचरू गरूड ( वय ५ ) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षक नवगिरे यांनी झिरो पोलिस असलेल्या गरुड यांच्यामार्फत मंगळवारी (ता. ३१ ) ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड करून तक्रारदाराने २५ हजार रुपये व झिरो पोलिस गरुड यास स्वतःसाठी २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी (ता.१) सापळा लावून कारवाई केल्याने पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, सहाय्यक अधिकारी पोलिस निरीक्षक प्रशांत सपकाळे, सापळा पथक पोलीस कर्मचारी माळी, बाविस्कर, प्रकाश महाजन यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ १०६४ या टोल फ्री व ९९३०९९७७०० या व्हाट्सअॅच्या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांच्या वेळ, पैसा, श्रम यांची बचत व्हावी, यासाठी ऑनलाइन तक्रार देखील दाखल करता येते.

हेही वाचा: नाशिक : तरुणाच्या खून प्रकरणी चार अल्पवयीन संशयित ताब्यात

loading image
go to top