Nashik Agriculture News : नव्या तंत्रामुळे भात लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ!

Nashik News : बळीराजाने खरीपाच्या मशागतीची कामे पूर्ण करुन राब (भाजणी ) केलेल्या जागेवर बागाईदार शेतकऱ्यांनी तसेच पावसाने हजेरी लावलेल्या क्षेत्रात भात व नागली रोपासाठी बियाण्यांची पेरणी केली आहे.
Due to new technology there will be increase in area of ​​rice cultivation
Due to new technology there will be increase in area of ​​rice cultivationesakal

Nashik News : तालुक्यातील आदिवासी बळीराजाने खरीपाच्या मशागतीची कामे पूर्ण करुन राब (भाजणी ) केलेल्या जागेवर बागाईदार शेतकऱ्यांनी तसेच पावसाने हजेरी लावलेल्या क्षेत्रात भात व नागली रोपासाठी बियाण्यांची पेरणी केली आहे . तालुक्यात यंदा मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध असून अधिकृत परवानाधारक दुकानातून शेतकऱ्यांनी बियाणे अथवा खतांची खरेदी करावी. (Due to new technology there will be increase in area of ​​rice cultivation)

पारंपरिक पद्धतीने होणारी लागवड खर्चिक असल्याने यावर्षी सगुणा राईस तंत्राच्या वापरामुळे लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पेठ तालुक्यात १४५ गावांतील सुमारे ५३८९५.४२ हेक्टर क्षेत्र असून यात २६५७.३२ हेक्टर क्षेत्र बागायत आहे. यंदा २६२४४.५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे . यात भात, नागली, वरई, खुरासणी, इत्यादी पिके मुख्यत्वे आदिवासी भागात घेतली जात असली तरी दिवसेंदिवस भात क्षेत्रात वाढ होत असून नागलीचे क्षेत्र घटत चालले आहे.

आदिवासी भागातील शेती खुपच कष्टमय असून वरच्या पावसावर अवलंबून असल्याने नागलीसाठी टप्याटप्याने पावसाची गरज असते . त्यामुळे भात शेतीचे क्षेत्रात वाढ झाली आहे . सगुणा राईस तंत्र पद्धतीने भात लागवड करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवलेले असून. तालुक्यात किमान एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाईल. यामुळे पारंपरिक पद्धतीने भात लागवडीचे क्षेत्र यंदा घटणार आहे.

नव्या पद्धतीने भात लागवड केल्यास लागवडीचा खर्च कमी येतो .मजुरीची बचत होऊन मनुष्यबळाची बचत होते. यापद्धतीने उत्पादनात वाढ होत असून ही भात लागवडीची पद्धत शेतकरी हिताची आहे. परंपरागत कृषी विकास योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीचे क्षेत्र विकसित होत असून सेंद्रिय प्रमाणीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. (latest marathi news)

Due to new technology there will be increase in area of ​​rice cultivation
Nashik Agriculture News : मका, सोयाबीन, भात, कपाशीला यंदा प्राधान्य; खरिपासाठी एक लाख 62 हजार क्विंटल बियाणे

पेठ तालुक्यात आंबा शेतीने शेतकऱ्याचा खिसा बऱ्यापैकी गरम केल्याने आंब्यातील गोडवा क्षेत्र वाढून अधिक गोड होणार आहे . यंदा पेठ तालुक्यातील सेंद्रिय आंबा कसा निर्यात होईल याकडे कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत .

"आदिवासी शेतकऱ्यांची पारंपारिक भात लागवड पद्धत ही खुप मेहनतीची असून चिखल तुडवून गाळ करून त्यात भात रोपांची लागवड करणे ही अंत्यत खर्चिक असून मोठ्या प्रमाणात मजुरांची मजुरी चुकवावी लागते . परिणामी उत्पन्न वाढीची कोणतीही शक्यता नाही .त्यामुळे शेतकऱ्यांनी सगुणा राईस तंत्राचा ( SRT )वापर करुन भात लागवड करावी . यंदा आंबा पिकाने पेठ तालुक्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चलन मिळवून दिले . फळबाग क्षेत्रात यावर्षी वाढ होत असून आंबा निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे." - अविनाश खैरनार, तालुका कृषी अधिकारी, पेठ

"यंदा खरीपाची तयारी पूर्ण झाली असून भात नागलीची रोपे तयार होण्यासाठी बियांण्याची पेरणी केलेली आहे . भात शेतीला मुबलक पावसाची गरज असते यंदा चांगला पाऊस होईल या आशेवर आदिवासी शेतकरी पावसाकडे बघतो आहे .तालुक्यात फळबागांनी चांगली कमाई दिल्याने आदिवासी बळीराजा फळबागांकडे वळू लागला आहे." - रामदास वाघेरे, शेतकरी, पेठ

Due to new technology there will be increase in area of ​​rice cultivation
Jalgaon Agriculture News : उत्राण परिसरातील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com