Nashik Lok Sabha Code Of Conduct : विनापरवानगी ‘कोपरा’ सभांना बंदी! दिंडोरीत 5 हजार कर्मचाऱ्यांचे कर्तव्याच्या ठिकाणीच मतदान

Code Of Conduct : विनापरवानगी सभा घेणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिला आहे.
Nashik Lok Sabha Code Of Conduct
Nashik Lok Sabha Code Of Conduct esakal

Nashik News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आचारसंहितेच्या काळात जाहीर सभांसह साधी कोपरासभाही घेण्यासाठी निवडणूक विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्‍यक आहे. विनापरवानगी सभा घेणाऱ्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिला आहे. (Nashik Lok Sabha Code Of Conduct)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राहणारे व निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणारे पाच हजार कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाणीच मतदान करणार आहेत. नाशिकप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर पारधे यांच्याकडून आचारसंहिता पालनाबाबत सूचना करण्यात आल्या. त्यानुसार कोणतीही सभा परवानगीशिवाय घेऊ नये, अशा सूचना या वेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना करण्यात आल्या. परवानगीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरीही परवानगी मिळण्यात अडचण येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पारधे यांनी केले आहे. १८ मेस सायंकाळी पाचपर्यंत जाहीर प्रचाराला परवानगी असेल. तोपर्यंतच प्रचारासाठीची वाहने फिरविता येणार असून, उमेदवार आणि त्यांचा प्रतिनिधी यांना एकूण दोनच वाहने मतदानापर्यंत वापरता येणार असल्याचे पारधे यांनी स्पष्ट केले. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Code Of Conduct
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पाच हजार ७०९ कर्मचाऱ्यांनी ईडीसी प्रमाणपत्र घेतले असून, त्या आधारे त्यांना कर्तव्यावर असलेल्या केंद्रावरच मतदान करता येणार आहे.

व्हिडिओ चित्रीकरणही होणार

ईव्हीएम मशिन्सची जोडणी करण्यासाठी आणि सिटिंग सिलिंग करण्यासाठी उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता येते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी जोडणी व सिलिंगचे काम होणार आहे. स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या मशिन्स ज्यांनी सील केल्या आहेत, त्यांच्याच उपस्थितीत त्या उघडण्यात येतील. त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.

ईव्हीएमची जोडणी व सिलिंगचे वेळापत्रक निश्‍चित

नांदगाव : ९ मे व १४, १५ मे २०२४

कळवण : १० मे व १४, १५ मे २०२४

चांदवड : ९ मे व १४, १५ मे २०२४

येवला : १० मे व १३ मे २०२४

निफाड : १० मे व १३ मे २०२४

दिंडोरी : ११ मे व १४, १५ मे २०२४

Nashik Lok Sabha Code Of Conduct
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com