Nashik News : ई-कुबेर प्रणाली शिक्षकांसाठी ठरतेय डोकेदुखी; 2 महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

Nashik News : १ तारखेला वेतन होत असताना पुन्हा शासनाने ई-कुबेर प्रणाली विकसित केली या नवीन प्रणालीमुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अडकले आहे.
E-Kuber system becomes headache for teachers
E-Kuber system becomes headache for teachersesakal

आराई : जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे वेतन प्रयोगिक तत्त्वावर सीएमपी प्रणालीने केल्याने दर महिन्याच्या १ तारखेला वेतन होत असताना पुन्हा शासनाने ई-कुबेर प्रणाली विकसित केली या नवीन प्रणालीमुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अडकले आहे. (Nashik E Kuber system becomes headache for teachers)

त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिक्षकांमधे प्रचंड असंतोष पसरला असून, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी शासनाने सीएमपी प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात केला.

तो यशस्वी झाल्याने शिक्षक समाधानी होते. राज्यात सार्वत्रिक प्रयोग करण्याची मागणी होत असतानाच नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे. काही तालुक्यांचे पुरेसे वेतन अनुदान नसल्याचे कारण सांगून जिल्ह्यात वेतन रोखण्यात येत होते. अनुदान प्राप्त झाले. तर आता नवीन आलेली ई-कुबेर प्रणाली अडचणीची ठरत आहे. शालार्थ वेतन प्राणालीचे बिल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतनही अडले आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक हवालदिल झाले आहेत. एलआयसी,पतसंस्था, बँकेचे हप्ते, कर्जावर अतिरिक्त व्याजाचा बोजा पडतोय, याशिवाय खर्चास पैसे नसल्याने शिक्षकांमधे कमालीचा असंतोष वाढत आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प कपात, मुख्याध्यापक अकाऊंट, जॉईंट बँक अकाऊंट अशा विविध समस्यांमुळे येणाऱ्या एररने कुबेर प्रणाली डोकेदुखी ठरत आहे. (latest marathi news)

E-Kuber system becomes headache for teachers
Nashik Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार, हेमंत गोडसेंचा अर्ज सादर

जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, पृथ्वीबाबा शिरसाठ, कांतीलाल सोनवणे यांनी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याशी चर्चा केली असून, या समस्या लवकरात लवकर निकाली काढू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, वेतनाचा प्रश्‍न निकाली निघत नसल्याने शिक्षकांमधे रोष व्यक्त केला जात आहे.

"शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने आधीच ई-कुबेर व शालार्थ प्रणालीचे टेस्टिंग करायला पाहिजे होते. तसे केले असते तर अशा अडचणी निर्माण झाल्या नसत्या." - दीपक सोनवणे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ नाशिक

E-Kuber system becomes headache for teachers
Nashik City Transport : शहरात पुन्हा ‘टोईंग’ सुरू; बेशिस्तांना बसणार दणका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com