Nashik Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार, हेमंत गोडसेंचा अर्ज सादर

Lok Sabha Constituency : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी अधिकारी जलज शर्मा व अप्पर जिल्हाधिकरी बाबासाहेब पारधे यांच्याकडे अर्ज सादर केले.
Dindori candidate Dr. Bharti Pawar while submitting the application in the presence of Chief Minister Eknath Shinde, Rural Development Minister Girish Mahajan.
Dindori candidate Dr. Bharti Pawar while submitting the application in the presence of Chief Minister Eknath Shinde, Rural Development Minister Girish Mahajan.esakal

Nashik News : भरउन्हात शहरातून रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत महायुतीच्या नाशिक व दिंडोरीच्या उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले. (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला .
नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला . esakal

नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांनी शिवसेना (शिंदे गट) व दिंडोरीतून भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी अधिकारी जलज शर्मा व अप्पर जिल्हाधिकरी बाबासाहेब पारधे यांच्याकडे अर्ज सादर केले. दरम्यान, दिवसभरात दोन्ही मतदारसंघांत २४ इच्छुकांनी अर्ज सादर केले.

त्यात नाशिकमधून १८ इच्छुकांचे २७ अर्ज आले; तर दिंडोरीत सहा इच्छुकांनी १३ अर्ज भरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य टपाल कार्यालयासमोरच भेट दिली. अन् कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यानंतर रॅली शालिमार, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.

दिंडोरीत सहा इच्छुकांचे १३ अर्ज

दिंडोरीतून भास्कर भगरे यांनी आज तीन अर्ज भरले. यापूर्वी एक भरल्याने त्यांचे एकूण चार अर्ज झाले आहेत. सोबत पक्षाचा ए. बी. अर्जही जोडला आहे. पल्लवी भगरे- २, डॉ. भारती पवार यांनी तीन अर्ज दिले असून, एबी फॉर्मही जोडला आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष दोन अर्ज भरले. (Latest Marathi News)

Dindori candidate Dr. Bharti Pawar while submitting the application in the presence of Chief Minister Eknath Shinde, Rural Development Minister Girish Mahajan.
Nashik Lok Sabha Constituency : शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी संकटमोचक ‘जनशांती धाम’मध्ये

शिवाजी बर्डे यांनी (भारत आदिवासी पक्ष), बाबू सदू भगरे यांनीही अपक्ष अर्ज सादर केला. भारत अरुण पवार (बीआरएस) यांनी एक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जे. पी. गावित यांनी एक, तर सुभाष चौधरी यांनी एक अर्ज भरला.

नाशिकमधून सादर केलेले अर्ज

- सुधीर श्रीधर देशमुख (अपक्ष)

- धनाजी अशोख टोपले (अपक्ष)

- जयश्री महेंद्र पाटील (सैनिक समाज पक्ष)

- कैलास चव्हाण (आम जनता पक्ष)

- कांतिलाल किसन जाधव (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया)

- निवृत्ती विठ्ठल अरिंगळे (अपक्ष)

- दर्शना अमोल मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष)

- करण पंढरीनाथ गायकर (वंचित बहुजन आघाडी)

- झुंजार म्हसूजी आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)

- प्रकाश गिरिधर कनोजे (अपक्ष)

- हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना- शिंदे गट)

- भक्ती अजिंक्य गोडसे (शिवसेना- शिंदे गट)

- जितेंद्र नरेश भाभे (अपक्ष)

Dindori candidate Dr. Bharti Pawar while submitting the application in the presence of Chief Minister Eknath Shinde, Rural Development Minister Girish Mahajan.
Nashik Lok Sabha Constituency : महायुतीचे नाशिक मध्ये गुरुवारी शक्ती प्रदर्शन; रॅली द्वारे गोडसे अन डॉ. पवार भरणार अर्ज

अर्जासाठी आज शेवटचा दिवस

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (ता. ३) शेवटचा दिवस असून, दुपारी तीनच्या आत उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे लागतील. आजपर्यंत नाशिकसाठी १०१ इच्छुकांनी अर्ज घेतले, त्यापैकी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दिंडोरीत ३८ इच्छुकांनी अर्ज घेतले असून, नऊ जणांचे दाखल झाले.

दिंडोरीत दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असून, नाशिकमध्ये पंधराच्या वर उमेदवार निवडणूक आखाड्यात असतील, असा अंदाज वर्तविला जातो. शनिवारी (ता. ४) अर्जांची छाननी करण्यात येईल; तर सोमवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे.

Dindori candidate Dr. Bharti Pawar while submitting the application in the presence of Chief Minister Eknath Shinde, Rural Development Minister Girish Mahajan.
Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com