Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

Mild earthquake of magnitude 3.8 on Richter scale: नाशिक जिल्हा प्रशासनाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०७७ (टोल फ्री) किंवा ०२५३-२३१७१५१ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
Nashik earthquake

Nashik earthquake

esakal

Updated on

Tremors in Nashik district today: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी ही घटना घडली असून कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. 3.8 रिश्टर स्केल या तीव्रतेचे धक्के जाणवल्याचं सांगितलं जातंय. याबाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

सुदैवाने शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती आहे.

Nashik earthquake
‘बीयर आणू का?’ वेटरच्या प्रश्नाने संतापले तुकाराम मुंढे; बॅग भरली अन् थेट दिल्ली सोडली, १९९६चा किस्सा सांगितला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com