Tukaram Mundhe Delhi story
esakal
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यातील अनेक भन्नाट किस्से ऐकायला मिळाले. ‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भविष्यवेध - संवाद भविष्याचा’ या उपक्रमातील ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षाच्या काळातील आठवणी मोकळेपणाने सांगितल्या.