Nashik Eknath Shinde : एकनाथ शिंदे- कोकाटे यांची प्रचारात सक्रिय होण्यासंदर्भात भेट

Nashik : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी कोकाटे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निवासस्थानी भेट घडवून आणल्यावर ते महायुतीसाठी प्रचारात सहभागी होतील, अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे.
While discussing with Chief Minister Eknath Shinde, MLA Adv. Manikrao Kokate, Shiv Sena Deputy Leader Ajay Boraste.
While discussing with Chief Minister Eknath Shinde, MLA Adv. Manikrao Kokate, Shiv Sena Deputy Leader Ajay Boraste.esakal

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे हे आता महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी कोकाटे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निवासस्थानी भेट घडवून आणल्यावर ते महायुतीसाठी प्रचारात सहभागी होतील, अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे. (Eknath Shinde Meeting with Kokate regarding being active in campaigning)

विकासकामांच्या श्रेयवादावरून यापूर्वी खासदार हेमंत गोडसे- आमदार ॲड. कोकाटे यांच्यात खडाजंगी झालेली आहे. मात्र, मागील सगळ्या गोष्टी विसरून माझ्यासाठी प्रचारात सक्रिय व्हा, अशी भावनिक साद या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकाटे यांना घातली आहे. खासदार गोडसे आणि आमदार कोकाटे यांच्यात फारसे सख्य कधीच नव्हते.

परंतु शिवसेनेने किल्ला लढवत नाशिकची जागा आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे महायुतीतील प्रत्येक घटक कार्यरत राहणे शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहे. कोकाटे हे सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात, या मुद्द्यावर त्यांचा उमेदवारीसाठीही विचार झाला. परंतु, नाशिकची जागा शिवसेनेने आपल्या पारड्यात ठेवण्यात यश मिळविले.

त्यानंतर कोकाटे हे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी कार्यरत होतील का, असे प्रश्न उपस्थित होत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी या विषयात मध्यस्थी करीत कोकाटेंची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घडवून आणली. त्यामुळे ते सक्रिय झाल्यास सिन्रर तालुक्यातून महायुतीला फायदा होऊ शकतो. या भेटीप्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर हेही उपस्थित होते. (latest marathi news)

While discussing with Chief Minister Eknath Shinde, MLA Adv. Manikrao Kokate, Shiv Sena Deputy Leader Ajay Boraste.
Nashik Unseasonal rain News : वणी परिसरात तासभर अवकाळी; उघड्यावरील कांद्याचे नुकसान

माणिकराव कोकाटे हे गेले काही दिवस सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती मुक्कामी होते. दरम्यानच्या काळात कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांच्या डीपी आणि स्टेट्सवरही राजाभाऊ वाजे यांचे समर्थन करणारी छायाचित्रे लावलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेल्या आवाहनाला कोकाटे आणि त्यांचे कार्यकर्ते कशारितीने प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"सिन्नर तालुका मतदारसंघातील प्रश्न आणि अडीअडचणींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. महायुतीच्या प्रचारात उतरण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेणार आहे." - ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

"माणिकराव कोकाटे यांचा मोठा जनसंपर्क सिन्नर तालुक्यात आहे. विकासकामांच्या माध्यमातून त्यांची ओळख जनतेला आहे. महायुतीच्या प्रचारात ते सहभागी झाल्यावर पक्षाला त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे." - अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना (शिंदे गट)

While discussing with Chief Minister Eknath Shinde, MLA Adv. Manikrao Kokate, Shiv Sena Deputy Leader Ajay Boraste.
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कर्मचाऱ्‍यांचे धरणे आंदोलन; पैसे देणाऱ्‍यांचीच बिले मंजूर होत असल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com