Nashik Electricity Supply : वीज वेळापत्रकाचा खेळ; शेतकऱ्यांचा बसेना मेळ! महावितरणच्या धोरणामुळे बळीजाची कोंडी

Nashik News : कधी दिवसा, तर कधी रात्री वीजपुरवठा केला जात असून, महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. एकच वेळ निश्‍चित करुन पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Mahavitaran
Mahavitaranesakal

मालेगाव : महावितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. यात सातत्याने वीजपुरवठ्याच्या वेळा बदलल्या जातात. बारा महिन्यात बारा नवीन वेळांचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाते. दिवसातून केवळ आठच तास शेतीपंपांना वीज दिली जाते. त्यातही विजेचा लपंडाव सुरु असतो. कधी दिवसा, तर कधी रात्री वीजपुरवठा केला जात असून, महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. एकच वेळ निश्‍चित करुन पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Nashik Electricity not Scheduled Farmers in tension)

महावितरणकडून कृषी विद्युत पंपांसाठी निर्धारीत वेळेतच वीजपुरवठा केला जातो. बहुतांशी ठिकाणी सोमवार ते गुरुवार या चार दिवशी दिवसा, तर शुक्रवार ते रविवार या तीन दिवस रात्री प्रत्येकी आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने जेमतेम चार ते पाच तास वीज मिळते. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार सलग आठ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा कधीच केला जात नाही. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. नियमित व पुरेसा वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेती उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे.

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मालेगाव विभागांतर्गत एप्रिल महिन्यात दिवसाची वेळ सकाळी आठ वाजून ३५ मिनिटे ते दुपारी चार वाजून ३५ मिनिटे अशी आहे. तर रात्रीची वेळ रात्री पाऊणेअकरा ते सकाळी पाऊणेसात अशी आहे. मे महिन्याचे शेती पंपांचे थ्री फेज वेळापत्रक देखील प्रसिद्ध झाले आहे.

मे महिन्यात सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा तर रात्री नऊ वाजून ५० मिनिटे ते सकाळी पाच वाजून ५० मिनिटापर्यंत या वेळेत कृषीपंपांना वीजपुरवठा केला जाणार आहे. दिवस-रात्रीचा हा खेळ बंद करुन सलग वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (Latest Marathi News)

Mahavitaran
Nashik News : मालेगावात 500 कोटीचे व्यवहार ठप्प! बाजार समितीचे 50 लाखांचे नुकसान

शेतीला दुय्यम स्थान

शेती पंपांना दिवसभर पुरेशा दाबाने वीजपुरवठ्याची मागणी सातत्याने होते. रात्री वीजपुरवठ्याचा फंडा अवलंबिला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करुन पिकांना पाणी द्यावे लागते. अनियमिततेमुळे अनेकांना वीजेचा धक्का लागून प्राण गमवावा लागल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत.

अशा अपघातातून अनेकांचे कुटुंब उद्‌ध्वस्त झाले आहे. विशेषत: पावसाळ्यात रात्रीच्या वेळी विंचू व सर्प दंशाच्या घटना घडत असतात. कमी-अधिक दाबामुळे वीजपंप जळाल्याचे प्रकार सातत्याने घडतात. वीजपुरवठ्याबाबत शेतीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

"महावितरण दिवसभरातून फक्त आठच तास वीजपुरवठा करते. त्यातही आठवड्याचे दोन टप्पे करून दिवसा चार दिवस व रात्रीचे तीन दिवस असे विभाजन केले आहे. विचित्र पद्धतीने म्हणजेच २१ वाजून ५० मिनिटे, १६ वाजून ३५ अशा पद्धतीने वेळांचे आकडे कुठून काढतात ते देवच जाणो. विद्युत महामंडळ कोणत्या तांत्रिक आधारावर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वेठीस धरून वेळापत्रक तयार करते हा संशोधनाचा विषय होवू शकतो. अनेक ठिकाणी खंडीत पुरवठ्यामुळे तीन ते चार तास देखील वीज मिळत नाही. कृषी पंपांना वीज पुरवठ्याबाबत महावितरण कंपनी दुजाभावाची वागणूक देते."- मुन्ना इंगळे, शेतकर

Mahavitaran
Nashik Summer heat: जीवाची काहीली थांबविण्यासाठी थंड पेयांना मागणी! लिंबू शिकंजी सरबता, उसाच्या रसाला सर्वाधिक पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com