Nashik News : मालेगावी चिंच फोडणीतून महिलांना रोजगार; उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये कुटुंबाला मिळतोय हातभार

Nashik : शहरात महिलांना रोजगाराच्या वणवा आहे. येथे तीन औद्योगिक वसाहत असून एकही वसाहतीत महिलांना पुरेसा रोजगार नाही.
Women breaking tamarind in Gulsher Nagar area.
Women breaking tamarind in Gulsher Nagar area.esakal

Nashik News : शहरात महिलांना रोजगाराच्या वणवा आहे. येथे तीन औद्योगिक वसाहत असून एकही वसाहतीत महिलांना पुरेसा रोजगार नाही. रोजगारासाठी महिला प्रामुख्याने प्लास्टिक गोडाऊन, तरासन भरणे, शिलाई, टोपी विणणे, नवीन ड्रेसेसवर काच करणे, मसाले पॅकेजीग, पापड तयार करणे यासह विविध काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. यात तुटपुंज्या रकमेत त्यांना काम करावा लागतो. ( Employment for women through malegaon tamarind crushing )

शहरातील नागरिकांचे यंत्रमाग हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. यंत्रमागाशिवाय औद्योगिक वसाहतीत पुरेसा रोजगार नसल्याने महिलांना पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. प्लास्टिक व तरासन भरणे यातून अगदी कमी पगार महिलांना मिळतो. शहरात चार महिने महिला पापड व चिंच फोडून कुटूंब चालवितात. शहरात चिंचचे ऐंशी गुदामे आहेत.

एका गुदामातून सुमारे चारशे ते पाचशे महिला जोडल्या आहे. गुदामचालक महिलांना त्यांच्या घरी चिंच फोडण्यासाठी देतात. यात तीन प्रकार असतात. यात प्रथम, द्वितीय, तृतीय दर्जाचा माल दिला जातो. एका किलो चिंच फोडल्यानंतर महिलांना १४ ते १६ रुपये मिळतात. एक महिला दोन दिवसात वीस किलो चिंच फोडते. दोन दिवसात चारशे ते पाचशे रुपये मिळतात. चिंच फोडण्याच्या कामातून येथे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या असल्याने शाळकरी मुलेही पालकांना मदत करतात. येथे चिंच नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सापुतारा या भागातून येतात. शहरात तीन दशकापासून चिंच फोडण्याचे काम केले जाते. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात चिंचेचा माल येथे येतो. गुलशेरनगर, म्हाळदे, गुलशने इब्राहिम, डेपो, रमजान पुरा, निहाल नगर, पवारवाडी, आयेशा नगर, नजमाबाद, शेख रशीद नगर या झोपडपट्टीतील महिला चिंच फोडण्याचा काम करतात. (latest marathi news)

Women breaking tamarind in Gulsher Nagar area.
Nashik News : उन्हाच्या तडाख्यात कुरडई, पापड तयार करण्याचा धडाका

चिंचेचा वापर असा होतो

चिंचेचा वापर अनेक महिला भाजी बनविताना करतात. कडक उन्हाळा असल्याने अनेक नागरिक रात्र भर पाण्यात चिंच भिजून ठेवतात व उन्हातून आल्यानंतर गूळ व चिंचेचा पाणी मिश्रण करून (पन्हे) पिल्याने उन्हापासून काही प्रमाणात बचाव होतो. शहरात बकरी ईदच्या काळात चिंचेचा चटणीची मागणी वाढते. तसेच चिंचेची चटणी, पाणी पुरी, जेली, चाटण, यासह अनेक वापरात चिंच वापर होतो.

''चिंच फोडणीत अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. चार महिन्याचा हा रोजगार असतो. महिलांना सर्वात मोठ्या प्रमाणत रोजगार देणार हा एकमेव रोजगार आहे. घरातील सर्व कामे करून घराच्या घरी महिला चिंच फोडतात. त्याचा दारापर्यंत चिंचेचा पुरवठा केला जात असल्याने अनेक महिला हे काम करतात.''- मसूद अहमद, संचालक, सुपर इमली, मालेगाव

''घर बसल्या रोजगार मिळतो. रोजगार नसल्याने कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी हे काम करावे लागते. यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागतो.''- मरियम शेख, चिंच फोडणारी महिला

''शासनाने महिलांना सक्षम करण्यासाठी मालेगावी मोठे रोजगार उपलब्ध करून घ्यावे. येथे प्लास्टिक शिवाय दुसरे मोठे उद्योग नाही. शासनाने महिलांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.''- मीना काकळीज, माजी नगरसेविका

Women breaking tamarind in Gulsher Nagar area.
Nashik News : उन्हाच्या तडाख्यात कुरडई, पापड तयार करण्याचा धडाका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com