Nashik News : अतिक्रमण निर्मूलन विभागाला अखेर जाग! मेनरोड, दही पूल भागात कारवाई

Nashik : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी (ता.२२) रविवार कारंजा, दही पूल, मेन रोड, गाडगे महाराज पुतळा, पिंपळ चौक या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली.
Encroachment Department staff lifting sign boards in front of shops in Main Road area.
Encroachment Department staff lifting sign boards in front of shops in Main Road area.esakal

Nashik News : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी (ता.२२) रविवार कारंजा, दही पूल, मेन रोड, गाडगे महाराज पुतळा, पिंपळ चौक या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर व विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविली. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. (nashik Encroachment removal action at Main Road and Dahipul area marathi news)

नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात मात्र तेथे लुटूपुटूची कारवाई केली जाते. सद्यस्थितीमध्ये मेन रोड, धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मोठी वाहने तर सोडाच पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. रमजान महिन्यानिमित्त दूध बाजार, भद्रकाली परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दुकाने थाटली गेली आहेत.  (latest marathi news)

Encroachment Department staff lifting sign boards in front of shops in Main Road area.
Nashik News : जिल्ह्यातील 221 शस्त्रास्त्रे पोलिसांकडे होणार जमा : जिल्हाधिकारींचे आदेश

तेथे कारवाई करणे अपेक्षित असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हाताची घडी घातली जात आहे. मेन रोडवरील गाडगे महाराज पुतळा, शालिमार या भागात दुचाकी रस्त्याने चालविताना वाहनधारकांना अतिक्रमणामुळे कसरत करावी लागते. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग आली.

दही पूल ते रविवार कारंजा, गाडगे महाराज पुतळा ते मेनरोड पिंपळ चौक या भागात मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत फलक, कपडे, भांडे, साइन बोर्ड अशा प्रकारच्या वस्तू जप्त करून आडगाव येथील गोडाऊनमध्ये टाकल्या. अतिक्रमण निर्मूलन कारवाई प्रवीण बागूल, बापू लांडगे, रमेश शिंदे, जावेद शेख, जगन्नाथ हामरे, सुनील कदम, संतोष पवार, संजय सूर्यवंशी यांनी केली.

Encroachment Department staff lifting sign boards in front of shops in Main Road area.
Nashik News : वडिलांच्या आठवणींसाठी घरासमोरच बांधले स्मृतीस्थळ! जाधव कुटुंबियांचा आदर्श

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com