Nashik News : पर्यावरण प्रेमी करणार झाडांचे नुकसान अन पुनर्रोपण ऑडिट; वाहतूक सुसाटचा दावा

Nashik : वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी नाशिक रोड-व्दारका रस्त्यावरील जुने वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुसाट धावणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
Vijay Jadhav, Tree Lover.
Adv. Ashwini Bhat, Environmental Petitioner
Vijay Jadhav, Tree Lover. Adv. Ashwini Bhat, Environmental Petitioneresakal

Nashik News : वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी नाशिक रोड-व्दारका रस्त्यावरील जुने वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुसाट धावणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर तोडलेल्या झाडांनंतर दहापट झाडे लावण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या संदर्भात वृक्षप्रेमींच्या नजरा पुनर्रोपण आणि नवीन लागवड याकडे असून या सर्व गोष्टींचे नाशिकचे पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी ऑडिट करणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (nashik Environment lovers will audit tree damage and replanting marathi news)

झाडे तोडले तरी रस्ता रुंद होणार नाही, मात्र वाहतूक सुसाट धावेल संभाव्य अपघात टळतील, असा जाणकारांचा दावा आहे. यामुळे वाहतूक कोंडीही टळेल. मात्र वृक्षतोडीनंतर आता दहापट वृक्ष लागवड झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसह पुनरोपणबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. यामुळे निसर्गाची झालेली शाश्वत हानी टाळण्यासाठी वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी या रस्त्याचे ऑडिट करणार आहेत.

वृक्ष तोडल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होणार आहे. दत्त मंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी २४ झाडे तोडण्यास महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तर या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस अनेक लहान-मोठे विक्रेते अतिक्रमण करतात, रस्त्यावर लहान मोठ्या वस्तू विकण्यासाठी आणतात पर्यायाने वाहने थांबून वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील क्रॉसिंगसह गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत. त्यामुळे या रस्त्यावरील दिशा स्पष्ट होतील. अतिक्रमण होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (latest marathi news)

Vijay Jadhav, Tree Lover.
Adv. Ashwini Bhat, Environmental Petitioner
Nashik News : अपेक्षित दराअभावी सोयाबीन घरातच; शेतकरी चिंतित

रुंदीकरण नाही मजबुतीकरण

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्दारका ते नाशिक रोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण नव्हे तर मजबुतीकरण होणार आहे. अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी १५ मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च अंदाजे १९.४२ कोटी खर्च येणार असला तरी खर्च वाढू शकतो.

यामध्ये रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे. या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. अतिक्रमणे ओळखण्यासाठी रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे मारणार असल्याचे सांगितले.

''झाडे तोडल्यानंतर या झाडांची लाकडे किती किलो भरली, रीतसर शासनाला ठेकेदारांनी रॉयल्टी भरली का, हे आम्ही तपासणार आहोत. तसेच एक झाड तोडल्यानंतर प्रशासनाने किती झाडे लावली आणि लावणार आहेत, याचे आम्ही ऑडिट करणार आहोत. विकास हवा आहे मात्र निसर्गाची हानी नको.''- ॲड. अश्विनी भट, पर्यावरण याचिकाकर्त्या

''जितकी झाडे तोडली त्याच्या दहापटीने झाडे शासनाने लावायला हवी. कारण कोरोना काळामध्ये आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. झाडे लावल्यावर मोफत ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांब अंतरावर शासनाने झाडे लावायला हवीत, त्याची निगा राखली जावी.''- विजय जाधव, वृक्षप्रेमी.

Vijay Jadhav, Tree Lover.
Adv. Ashwini Bhat, Environmental Petitioner
Nashik News : नवभारत साक्षरता परीक्षेला 70 टक्के उपस्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com