Nashik: "माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत नाशिकची इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलचा राज्यात पहिला क्रमांक; 51 लाखांचे बक्षीस

Nashik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात "माझी शाळा सुंदर शाळा" ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वात उत्तम शाळा म्हणून नाशिकच्या इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
Nashik: "माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत नाशिकची इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलचा राज्यात पहिला क्रमांक; 51 लाखांचे बक्षीस

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात "माझी शाळा सुंदर शाळा" ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वात उत्तम शाळा म्हणून नाशिकच्या इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. राज्‍यस्‍तरावरही इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलने प्रथम क्रमांक पटकावतांना ५१ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्ते स्कूलला मंगळवार दि. 5 मार्च हे बक्षीस दिले जाणार आहे. (nashik Espalier Heritage School of Nashik won first position in state in My School Beautiful School competition marathi news)

इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल केंद्रात प्रथम, नाशिक तालुकामध्ये प्रथम, जिल्हास्तरीय सुद्धा प्रथम तसेच उत्तर महाराष्ट्रात (विभागीय) प्रथम पारितोषक मिळाले होते. महिरावणी केंद्र, त्यानंतर तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत एकूण पाच कमिटी गेल्या एक महिना शाळेत येऊन विविध गोष्टींचा खास करून शैक्षणिक गुणवत्तेचा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीणविकास कसा होत आहे, यावर तपासणी करत होते.

एकूण शंभर गुणांच्या मुद्द्यांमध्ये इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला 97.5 गुण पडून राज्यामध्ये ही सर्वात उत्तम शाळा म्हणून खासगी शाळांच्‍या गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. खासगी शाळांच्‍या गटातून बारामतीचे शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेने दुसरा तर छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवे पाटील शाळेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

सरकारी आणि खासगी शाळा या दोघांचेही विभाग स्पर्धेसाठी स्वतंत्र होते. खासगी शाळेमध्ये अनुदानित शाळांचा सुद्धा समावेश या स्‍पर्धेत केला होता. महाराष्ट्रातील १ लाखांहून अधिक सर्व सरकारी, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये ही तपासणी झाली. तपासणी झाली की जी शाळा पहिला टप्पा पार करयाची तीच दुसऱ्या टप्प्यात जाण्यास पात्र होत होती. आणि शेवटचा टप्पा राज्यस्तरीपर्यंत होता. (latest marathi news)

Nashik: "माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत नाशिकची इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलचा राज्यात पहिला क्रमांक; 51 लाखांचे बक्षीस
Nashik News : पथविक्रेता निवडणूक लोकसभेमुळे लांबणीवर; 40 लाखाच्या खर्चास महापालिकेकडून मंजुरी

यामध्ये प्रत्येक टप्प्यावर शाळेचं सौंदर्यीकरण, स्वच्छता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मुख्य म्हणजे शाळेत शेती उपक्रम तसेच परसबाग असणे अनिवार्य होते. नावीन्यपूर्ण उपक्रम आणि टेक्नॉलॉजीचा अधिक वापर हा सुद्धा महत्त्वाचा निकष होता. ज्या शाळा सर्व निकष पूर्ण करेल त्यांना प्रत्येक स्तरावर पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस होते.

इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल सर्व खाजगी शाळेच्या विभागामधून तालुकास्तरापासून ते राज्यापर्यंत पहिला क्रमांकाचे बक्षीस पात्र झाले. शाळांच्या मुख्याध्यापीका अंकिता कुर्या, सबा खान आणि चेअरपेर्सन डॉ प्राजक्ता जोशी यांनी शाळा विकारावर मेहनत घेतली.

''बक्षीसाची रक्कमेतून फिरती शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांत कौशल्य विकासासाठी उपक्रम राबविणार इस्पॅलिअर स्कूलने पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. या अभिनव शिक्षण पद्धतीचा गौरव या निमित्ताने झाला.

राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या माध्यमातून तसेच बक्षिसाची रक्कमेचा विनियोग जिल्हा परिषद मधील सरकारी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाकरीता फिरती शाळा बनवण्यासाठी करणार असून त्यातील महिरावणी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना शैक्षणिक साहित्य सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. सरकारकडून बक्षीस मिळाल्यानंतर बक्षिसाची संपूर्ण रक्कम सरकारी शाळांच्या विकासासाठी वापरणार आहे.''-(सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक, इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल )

Nashik: "माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत नाशिकची इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलचा राज्यात पहिला क्रमांक; 51 लाखांचे बक्षीस
Nashik ZP News : चारपेक्षा अधिक निविदांची फाइल आता निविदा समितीकडे : डॉ. अर्जुन गुंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com