Nashik Leopard News: बागलाणमध्ये बिबट्याची कमालीची दहशत; पश्चिम पट्ट्यात दररोज होतेय दर्शन

Leopard News : बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी 'सातच्या आत घरात' कोंबून घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
Leopard
Leopard esakal

सटाणा : बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्यातील आरम व हत्ती नदी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.

शेतकरी भयभीत झाले असून शेत शिवारातील तसेच वाड्यावत्यावरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने (Leopard) आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी 'सातच्या आत घरात' कोंबून घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बिबट्याच्या भीतीने आबालवृद्धांना ग्रासले असून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (Nashik leopards in Baglan marathi news)

रविवारी (ता.२५) कंधाणे येथील अंबादास देवरे यांच्या जोरण शिवारातील शेतात बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. वनविभागाने त्याची विल्हेवाट लावली. विनायक देवरे यांच्या गोठ्यातील पाळीव कुत्रा सोमवारी (ता.२६) सकाळी सातला सोडताच बिबट्याने त्याच्यावर झडप घालून कुत्रा फस्त केला.

डिसेंबरमध्ये हत्ती नदीलगत जोरण स्मशानभूमीजवळ मुल्हेरच्या उतारावर एका दुचाकीस्वाराने तीन बछड्यांसह बिबट्या पाहिला. घाबरून भरधाव दुचाकी नेत असताना एका बिछाड्याला मार लागून तो जागीच गतप्राण झाला. त्या बिबट्याने रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील केले होते.

अंधार पडताच बिबट्याचे गुरगुरणे ऐकू येत असे. त्यामुळे अंधार पडल्यावर कोणीही त्या रस्त्याने ये-जा करत नव्हते. त्या चवताळलेल्या बिबट्याने काही दुचाकीस्वारांवरही झडप घातल्याने जोरण येथेही पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र तेथेही पिंजरा बसविण्यात आला नाही.

वर्षभरापासून बागलाण तालुक्यातील कंधाणे, निकवेल, तिळवण, निरपूर, सरवर, वरदर शिवार, दहिंदुले, डांगसौंदाणे, चापापाडे, मोरकुरे, पठावे, तळवाडे, किकवारी, जोरण, विंचुरे, वटार चौंधाणे, केरसाने, दसाने, मुंगसे आणि परिसरात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यामुळे सर्वत्र विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असला तरी लोडशेडिंगमुळे रात्रीचे उन्हाळी कांदा, मका, गहू, हरभरा, ऊस, तसेच भाजीपाल्याच्या पिकांना जीव मुठीत धरून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कंधाणे शिवारातील भागडा डोंगर उतार, डांगसौंदाणे ते मुंजवाड, खमताणेपर्यंतचा आराम नदी व तळवाडे, मोरकुरे, पठावे ते तरसाळी सटाणा शिवारापर्यंत हत्ती या दोन्ही नद्यांच्या दुतर्फा काठावर वाढलेल्या सुबाभूळ, गंगूताई, चंदन, निलगिरी, बोरु, वेळू व इतर काटेरी झाडे झुडपांमध्ये लपण्यासाठी जागा असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. (Latest Marathi News)

Leopard
Leopard : बारामतीत तीन दिवस बिबट्याचा मुक्त संचार; काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

अनेकदा बिबट्या विहिरीत पडल्याचेही प्रकार सर्रास घडत आहेत. वर्षभरात शेतकऱ्यांनी आवडीने पाळलेले गावठी किंवा अन्य जातीचे शेकडो कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. कुत्रा हे तर बिबट्याचे आवडते खाद्य बनले आहे. खुराड्यात असलेल्या कोंबड्यांचा फडशा पाडणे, पाळलेल्या मांजराला अलगद उचलणे, उघड्या जागेवर किंवा दरवाजा नसलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्या, वासरू, पारडू असे लहान जनावरे बिबट्या सर्रास उचलून नेत आहे. कुणाच्याही घरी,

मळ्यात शेतात कुठेही कुत्रे दिसत नाहीत किंवा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत नाही. वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपाचे पिंजरे ठेवून आम जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. बिबट्यांना पकडून दूरवर जंगलात सोडल्यास भीती कमी होईल मात्र वनविभागाकडून अशी कार्यवाही होत नसल्याची खंत सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

"कंधाणे, विंचुरे, जोरण, किकवारी, तळवाडे, तिळवण, निरपूर आणि परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतशिवारात जीव मुठीत धरून राहावे लागते. वनविभागाने टाळाटाळ न करता कंधाणे शिवारात दोन-तीन ठिकाणी तातडीने पिंजरा बसून नागरिकांना दिलासा द्यावा."

- बंटी पाटील, सरपंच, ग्रामपंचायत कंधाणे

Leopard
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com