Surat Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्गाला नाशिकच्या शेतकऱ्यांचा ग्रीन सिग्नल

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Surat Chennai Highway
Surat Chennai Highwayesakal

Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील ओढा, लाखलगाव व विंचूर गवळी या तीन गावांमधील ४० हेक्टर जागा संपादित होणार आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी शुक्रवारी (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली. (Nashik farmers give green signal to Surat Chennai highway nashik news)

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, कार्यकारी अभियंता दिलीप पाटील, भूसंपादन अधिकारी शर्मिला भोसले यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ओढा, लाखलगाव व विंचूर गवळी या तीन गावांमधील ३६ शेतकऱ्यांनी जीएम पोर्टलच्या मूल्यांकनाविषयी तक्रार केली होती. यात वयस्कर झाडांचे मूल्यांकन हे रोप म्हणून करण्यात आले.

तर विहीर, पाइपलाइन यांचे मूल्यांकन कमी केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्याविषयीचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. तसेच ज्या शेतकऱ्यांना लवादाकडे अपील करायचे असेल त्यांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीला दिंडोरी, निफाड व आडगावचे काही शेतकरी उपस्थित होते. त्यांनीही आपले प्रश्न उपस्थित केले. नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांचे समाधान झाल्याने ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वेचा मार्ग मोकळा झाल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.

Surat Chennai Highway
Surat Chennai Highway : सुरत- चेन्नई महामार्गाच्या फेरआढाव्याकडे लक्ष; जमिनीच्या योग्य, अपेक्षित दराबाबत आशावादी

असा आहे प्रकल्प

सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून नाशिक ते सुरत प्रवास अवघ्या दोन तासांत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात १९५ हेक्टर भूसंपादन होणार आहे.

तर जिल्ह्यात १२२ किलोमीटर महामार्ग सहापदरी असून पाच मीटरचे दुभाजक आहेत. महामार्ग २६ किलोमीटर जंगलातून जाणार असून सुरगाणा तालुक्यातील संबरकल येथे १.३५ किलोमीटरचा बोगदा करणार आहेत. सिन्नर तालुक्यात वावी येथे समृद्धी महामार्गाशी कनेक्ट करण्यात येणार येईल.

Surat Chennai Highway
Surat Chennai Highway : सुरत- चेन्नई महामार्गाच्या फेरआढाव्याकडे लक्ष; जमिनीच्या योग्य, अपेक्षित दराबाबत आशावादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com