

FDA Action in Nashik Five Sweet Manufacturers Face Licence Suspension Over Serious Food Safety and Hygiene Violations
sakal
नाशिक : सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाशिक विभागामार्फत शहर आणि जिल्ह्यात अन्न आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. यादरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या नाशिकमधील ५ प्रमुख मिठाई उत्पादक आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्याची मोठी कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे.