Nashik News : ‘गुरूजींचे’ पगार वेळेवर कधी होणार? वेगवेगळ्या प्रणालीत अडथळ्यांची शर्यत

Nashik : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे. सीएमपीसह वेगवेगळ्या प्रणालीतील अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही.
salary issues
salary issuesesakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे. सीएमपीसह वेगवेगळ्या प्रणालीतील अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही. गेल्या तीन महिन्यांपासून दरमहा वेतन उशिराने होत असल्याने ‘गुरूजीं’चे अर्थकारण कोलमडले आहे. जिल्हा परिषदेच्या ११००० गुरूजींच्या पगाराबाबत प्रत्येक महिन्याला काही तरी अडचणी येत असून, बजेट अन् तांत्रिक अडचणी; शासनाच्या निर्देशाचेही कुठेही पालन होत नसून गुरूजींच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर प्रशासनासह संबंधित यंत्रणेसह ‘संघटनानांही’ टीकेचे लक्ष्य केले आहे. ( finances of teacher have collapsed as salary has been delayed every month )

शासन निर्णयानुसार शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला झाले पाहिजे. वेतन उशिरा होत असल्याने प्राथमिक शिक्षकांना कर्जासाठी नाहक व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा वेतन झाल्याने अनेकांचे सिबिल खराब होतो. विशेष म्हणजे मार्च महिना सणासुदीचा, एप्रिल महिन्यात प्रचंड लग्न सराई असतानाही वेतनाचे कसलेही चिन्ह नाही. उधार उसनवारीसह आर्थिक अडचणीत भर पडली असून, ऐन कडक उन्हाळ्यात गुरू जणांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

एप्रिल संपत आल्याने वर्षानुवर्षे ‘मे’ महिन्यात पगार होण्याची परंपरा प्रगत तंत्रज्ञानाच्या काळातही कायम असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांतील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास सातत्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

संयुक्त खात्यामुळे विलंब!

शासन निर्णयानुसार दरमहा एक तारखेला पगार करण्यात अजूनही यश आलेल नाही. कुठल्याही सणाच्या निमित्ताने पगाराचे पत्र काढले जाते पण अंमलबजावणी होत नाही. जिल्हा परिषदेच्या इतर विभागांसह सर्व कर्मचारी यांचे वेतन नियमित एक तारखेलाच होते. मग, शिक्षकांच्याच वेतनास दिरंगाई का? संघटनांच्या बैठकांवर बैठका झडतात. (Latest Marathi News)

salary issues
Nashik News : डोंगरावर नसला, तरी कागदावर मुबलक चारा; नांदगाव तालुका कृषी विभागाची बेफिकिरी

ठोस निर्णय व कार्यवाहीत अडसर व तांत्रिक कच्चे दूवे काय? यावर अधिकारी व वेतनातील यंत्रणेने शोध घ्यावा. ‘ई- कुबेर’ प्रणालीबाबत सूचना देण्यात आल्या नाहीत का? तरीही वेतनासाठी काही तालुक्यातील मोजक्या ‘गुरूजींचे’ संयुक्त खाते क्रमांक पगारासाठी दिलेले असल्यामुळे हा विलंब होत असल्याची खमंग चर्चा सोशल मिडीयावर आहे.

''शिक्षक बांधवांचे होम लोन, पर्सनल लोन, मेडिकल व अन्य पॉलीसी, कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारे पाल्य यांच्या फीसह तर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तारांबळ होते. वारंवार सूचना देऊनही काही लोकांच्या चुकीचा फटका संबंध जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारास बसतो.''- अनिल जगताप, विभागीय उपाध्यक्ष, शिक्षक सेना

''जिल्हाभरातील पंचायत समिती आस्थापना व जिल्हा परिषद प्रशासनातील आस्थापना यांचा पगारा बाबतीत हलगर्जीपणामुळे वेतन उशिराने होत आहे. संघटनांचे याकडे होणारे दुर्लक्ष ‘बाबुगिरी’ कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. अन्यथा, वेतनासाठी आंदोलन करावे लागेल.''- शरद ठाकूर, सरचिटणीस, शिक्षक परिषद, मालेगाव

''शिक्षकांच्या वेतनानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे नियोजन करण्याची गरज आहे. तरच दरमहा एक तारखेला वेतन मिळेल.''- किरण जगताप, प्रसिद्धी प्रमुख, शिक्षक भारती मालेगाव

salary issues
Nashik News : ‘जीएसटी’ची खोटी माहिती शोधणार ‘एआय’ : सुमेरकुमार काले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com