Nashik Fire Accident : सारडा सर्कलवर इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

Electric bike caught fire in Sarada Circle area
Electric bike caught fire in Sarada Circle areaesakal

Nashik Fire Accident : सारडा सर्कल येथील एका इलेक्ट्रिक दुचाकी शोरूम बाहेर उभी असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (ता.३०) दुपारी चारच्या सुमारास घडली. यात दुचाकी जळून खाक झाली. (Nashik Fire Accident Electric bike burnt on Sarda Circle)

सारडा सर्कल येथील एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आली होती. दुसऱ्या कंपनीची दुचाकी असल्याने त्या शोरूम मालकांनी दुरुस्ती करण्यास नकार दिला. दुचाकी मालकाने दुचाकी शोरूमच्या बाहेरच फुटपाथवर उभी केली.

काही वेळानंतर दुचाकीतून धूर येण्यास सुरवात झाली. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलेंडरच्या माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न केला. क्षणात आगीने पेट घेतल्याने त्यांना आग विझवणे शक्य झाले नाही. अग्निशामक विभागास माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Electric bike caught fire in Sarada Circle area
Dharavi Crime: मुंबई हादरली! प्रियकराकडून प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

जळीत दुचाकी संदर्भात तेथील शोरूमच्या कर्मचाऱ्यांशी माहिती घेतली असता, त्या दुचाकीशी त्यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. दुचाकी नादुरुस्त झाल्याने तिच्या मालकाने ती दुरुस्तीसाठी आणली होती. आमच्या कंपनीची नसल्याने दुरुस्तीस नकार दिला.

Electric bike caught fire in Sarada Circle area
Crime news : जेवणाच्या पार्टीमध्ये मटण जास्त घेण्याच्या कारणावरून केला मित्राचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com