

Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
sakal
-प्रशांत भरवीरकर
नाशिक : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघ संवर्धनाची चर्चा होत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरीच्या सलग वनपट्ट्याकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचा निष्कर्ष वन्यजीव अभ्यासकांनी काढला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेला हा परिसर भविष्यात वाघांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र रस्ते, रिसॉर्ट, पर्यटनाचा वाढता दबाव आणि जंगलाचे तुकडीकरण यामुळे हा नैसर्गिक वन्यजीव मार्ग धोक्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर-अंजनेरीच्या जंगलात ‘सायलेंट कॉरिडॉर’ची गरज असल्याची नोंद अभ्यासकांनी नोंदवली आहे.