Nashik Fraud Crime : सोन्याचे बिस्किटांचे आमिष दाखवून वृद्धेची लुट; नाशिकरोडला बंटी-बबलीने घातला गंडा

Fraud Crime : पळसे येथे जाणार्या वृद्धेला बंटी-बबलीने भुरळ पाडत सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष दाखवून त्यांच्याकडील ४० हजारांचे सोन्याचे दागिने घेत गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
Crime
Crimeesakal

नाशिक : पळसे येथे जाणार्या वृद्धेला बंटी-बबलीने भुरळ पाडत सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष दाखवून त्यांच्याकडील ४० हजारांचे सोन्याचे दागिने घेत गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित बंटी-बबलीविरोधात नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Robbery of an old woman by luring her with gold biscuits)

६० वर्षीय पुष्पा सिताराम उघाडे (रा. जोगल टेंभी, ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्या नाशिकरोड परिसरातील वास्को चौकातून मुलांसाठी खाऊ खरेदी केला आणि त्या रेल्वेस्थानक बसस्थानकाकडे पायी जात होत्या. त्यावेळी अज्ञात ३५ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला यांनी वृद्धेशी बोलत-बोलत आम्हालाही पळसेला जायचे आहे.

Crime
Nashik Fraud Crime : खोटा मेसेज दाखवून फसवणुक करणारा संशयित जेरबंद

आपण सोबतच जाऊ असे म्हणत त्यांना जुन्या मनपा कार्यालय रोडने देवी चौकाकडे जाताना झवेरी भवनसमोर आणले. त्यावेळी संशयित म्हणाला, आजी, मी तुम्हाला सोन्याची बिस्किटे देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत मला द्या, असे म्हणाला. त्यावेळी संशयिताने वृद्धेला संमोहीत करून भुरळ पाडली. वृद्धेने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत संशयिताच्या हातात दिली आणि संशयिताने पिवळ्या रंगाच्या कागद चिकटवलेले लोखंडी तुकडा वृदधेच्या हातात दिला.

संशयित बंटी-बबलीने त्यानंतर पोबारा केला. नंतर वृदधेच्या लक्षात आले की संशयितांनी त्यांना गंडा घातला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस बंटी-बबलीचा शोध घेत असनू उपनिरीक्षक एस.पी. बिडकर हे तपास करीत आहेत.

Crime
Nashik Fraud Crime : सोलर कृषीपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची 10 लाखांची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com