

Ashok Kharat scandal
ESakal
महाराष्ट्रात 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्यावरील लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासात अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत. आता खरात यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. तपासात असे उघड झाले आहे की, भोंदू बाबा आपल्या कर्मचाऱ्यांशी सांकेतिक भाषेत बोलत असत. अशोक खरातचे कर्मचारी त्यांचा प्रत्येक हावभाव समजू शकत होते.