

Nashik Godavari Ghat Tragedy Five Children Drown In Gandhi Lake Four Saved By Tribal Lifeguards One Dies In Incident
sakal
नाशिक: गांधी तलावात स्नानासाठी उतरलेल्या उत्तर भारतीय कुटुंबातील पाच मुले पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागली. आदिवासी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्यात उडी घेत चार मुलांचे प्राण वाचविले. मात्र, गोपाल गुप्ता याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गोदाघाट परिसरात खळबळ उडाली.