Drowned During
sakal
नाशिक/पंचवटी: गणेश विसर्जनाच्या वेळी शनिवारी (ता. ६) दोन युवक पाण्यात बुडाले होते. त्यांच्या शोधासाठी सलग दोन दिवस सुरू असलेले प्रयत्न सोमवारी (ता. ८) यशस्वी ठरले. प्रवीण शांताराम चव्हाण (वय २५, मूळ रा. मालेगाव, सध्या सातपूर कॉलनी) याचा मृतदेह गाडगे महाराज पुलाजवळ, तर विष्णू डगळे (३४, रा. गंगापूर) यांचा मृतदेह सोमेश्वर धबधबा परिसरात सापडला.