Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा मिळालेला दर्जा, आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन गणेश मंडळांची नाराजी नको म्हणून महापालिका प्रशासनाला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार मंडप शुल्काबरोबरच जाहिरात कर वसूल न करण्याचा निर्णय महासभेत प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी देऊन घेतला आहे. ज्या मंडळांनी मंडप शुल्क भरले, त्या मंडळांचे शुल्क परत केले जाणार आहेत.