Nashik Veer Miravnuk: वीरांच्या मिरवणुकांनी गजबजला गोदाघाट! नवसाला पावणाऱ्या दाजिबासह येसोजींच्या दर्शनासाठी लोटली गर्दी

Nashik News : शहराची प्राचीन ओळख असलेल्या वीरांच्या मिरवणुकांनी सोमवारी (ता.२५) सायंकाळनंतर गोदाघाट गजबजून गेला होता.
little kids in Veer miravnuk
little kids in Veer miravnukesakal

नाशिक : शहराची प्राचीन ओळख असलेल्या वीरांच्या मिरवणुकांनी सोमवारी (ता.२५) सायंकाळनंतर गोदाघाट गजबजून गेला होता. घरापासून रामतीर्थापर्यंत वीरांच्या भव्य मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. विविध देवदेवतांच्या वेषभूषा केलेले चिमुरडे मिरवणुकांचे आकर्षण ठरले. सायंकाळनंतर गोदाघाट परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. नवसाला पावणाऱ्या दाजिबा (बाशिंगे) वीरासह घनकर गल्लीतून काढलेल्या वीरांच्या दर्शन व नवसासाठी तोबा गर्दी उसळली. पंचवटी पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने उत्सव शांततेत पार पडला. (Nashik Goda Ghat buzzes with procession of veer news)

वीरांच्या मिरवणुका काढण्याची प्राचीन परंपरा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी या मिरवणुका निघतात. घरोघरी देव्हाऱ्यात असलेले वीरांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेवून व लाल कापडात बांधून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. रामतीर्थावर वीरांना म्हणजे पूर्वजांना विधिवत स्नान घातल्यावर घरोघरी तळी आरती करून या उत्सवाची सांगता होते.

लहान मुले व युवक विविधरंगी वेषभूषा करून रामतीर्थाच्या दिशेने वाजत गाजत येत होते. होळी भोवती पाच प्रदक्षिणा करून नंतर रामतीर्थात देवाला स्नान घालून विधिवत पूजन केले. त्यानंतर घरोघरी तळी भरून ‘बोल विरोबा की जय’ अशा जयघोषात खोबऱ्याचा प्रसादाचे वाटप केला.

यानिमित्ताने गोदाघाटावर मांडलेल्या खेळण्यांसह खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी उसळली होती. शहरासह नांदूर, मानूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी अशा ग्रामीण भागातही वीरांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. (latest marathi news)

little kids in Veer miravnuk
Rohit Sharma Holi: लालेलाल हिटमॅन...! मुंबई इंडियन्सने शेअर केला धुळवडीचा खास Video

चिमुरडे ठरले आकर्षण

भगवान शंकर, श्रीराम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा विविध वेषभूषेतील चिमुरडे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या चिमुरड्यांसोबतचे फोटोसेशनही अनेक ठिकाणी सुरू होते. गोदाआरती व वीरांच्या मिरवणुकांमुळे सायंकाळी सातनंतर गोदाघाटावर प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे रामतीर्थ परिसरासह गोदाघाटावर पाय ठेवायलाही जागा नव्हती.

दाजीबा, येसोजी वीर

नवसाला पावणारे वीर म्हणून दाजीबा व येसोजी वीर ओळखले जातात. या दोन्ही वीरांना नवस केल्यास त्याची पूर्ती होते, अशी भावना असल्याने अनेकजण रात्री उशिरापर्यंत या वीरांची त्यांच्या मार्गावर वाट पाहतात. यातील दाजीबा वीराची मिरवणूक बुधवार पेठेतून तर तर येसोजींची मिरवणूक घनकर गल्लीतील मोरे कुटुंबीयांकडून तुळजाभवानी देवी मंदिरापासून निघते. पहाटेपर्यंत या मिरवणुका सुरू होत्या.

little kids in Veer miravnuk
Holi Festival 2024 : देवळ्यात पर्यायावरणपूरक होळी व धुळवड साजरी; नैसर्गिक शेती करण्याचाही दिला संदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com