Nashik News : ‘माहेरघरी’ प्रसूतीला मिळतेय पसंती! वैद्यकीय सुविधा अन्‌ 300 रुपये रोजाने मानधन

Nashik : पावसाळ्यात गरोदर मातांचे ऐनवेळी होणारे हाल टाळण्यासाठी शासनाने आदिवासी भागातील गरोदर मातांसाठी ‘माहेरघर’ योजना सुरू केली आहे.
pregnant
pregnantesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्यात गरोदर मातांचे ऐनवेळी होणारे हाल टाळण्यासाठी शासनाने आदिवासी भागातील गरोदर मातांसाठी ‘माहेरघर’ योजना सुरू केली आहे. प्रसूतीच्या १५ दिवस आधीच मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गत जून ते सप्टेंबरपर्यंत दिंडोरी, पेठ व सुरगाणा या तालुक्यांतील २८ महिलांची आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे. ( government has started Maherghar scheme for pregnant mothers in tribal areas )

या महिलांना मोफत जेवण, वैद्यकीय सुविधा व ३०० रुपये रोज याप्रमाणे पैसेही दिले जातात. इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी एका गरोदर मातेला अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागली. रस्त्याअभावी तिला भर पावसात चालावे लागल्याने यातच तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जुलै २०२३ मध्ये तळोघ जुनवणेवाडी येथे घडली. या घटनेची राज्य सरकारने दखल घेत गरोदर मातांसाठी माहेरघर योजना सुरू केली.

पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत प्रसूती निश्‍चित असलेल्या महिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रसूतीच्या १५ दिवस अगोदर त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी एक कक्ष राखीव ठेवण्यात येईल. जोखमीच्या गरोदर मातांना सामान्य रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. (latest marathi news)

pregnant
Nashik ZP News : मॉन्सूनपूर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करा

रुग्णालयात दाखल झाल्यास आपली मजुरी बुडेल म्हणून महिला रुग्णालयात मुक्कामी येणार नाहीत, यावर उपाय म्हणून १५ दिवसांचे ३०० रुपयांप्रमाणे सरकार पैसेही देणार आहे. अशा परिस्थितीत आदिवासी भागातून जून, जुलै व ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांसाठी २८ महिलांची नोंदणी झाली.

दिंडोरीतील १५, पेठच्या दहा, तर सुरगाण्यातील तीन महिलांचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही गरोदर मातांच्या माहेरघर योजनेविषयी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने ही तयारी केली आहे.

''आदिवासी भागातील गरोदर मातांसह त्यांच्या आधीच्या बाळासह एका व्यक्तीला मोफत जेवण दिले जाते. पंधरा दिवस आधी गरोदर मातेला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले जाते. मातेला ३०० रुपये मजुरी दिली जाते. या योजनेंतर्गत सप्टेंबर २०२४ पर्यंत महिलांची नोंदणी झाली आहे.''- डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

pregnant
Nashik News : पॉवर ट्रान्सफार्मर फुटल्याने नाशिक शहरासह 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com