Satyajeet Tambe : काँग्रेस सोडण्याबद्दल सत्यजित तांबेंनी 'ओपन माईक'मध्ये केलं होतं सूचक वक्तव्य

काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सुधीर तांबेंनी आपला मुलगा सत्यजित तांबेंसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Newsesakal
Summary

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) सस्पेन्स अखेर मिटला आहे.

Satyajeet Tambe News : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) सस्पेन्स अखेर मिटला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सुधीर तांबे यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

त्यांच्या जागी सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असतील. दरम्यान, 'सरकारनामा'च्या एका कार्यक्रमात सत्यजित तांबेंनी काँग्रेसबाबत भन्नाट उत्तर दिलं होतं. काँग्रेसला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात झाली. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना 'सरकारनामा'च्या कार्यक्रमात काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तांबेंनीही एकदम कडक उत्तर दिलं.

'मी काँग्रेस सोडणार नाही'

आता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस सोडणार का? यावर तांबे म्हणाले, मी काँग्रेस सोडणार नाही. चांगले वाईट दिवस येत असतात. मी संघटनेमध्ये 20 वर्षापासून काम करत आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. राहुल गांधींच्या यात्रेमुळं काँग्रेसला फायदा होईल, असं मत 'सरकारनामा ओपन माईक सीजन 2' या कार्यक्रमात सत्यजित तांबेंनी व्यक्त केलं होतं.

Satyajeet Tambe News
Indian Medicines : उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू; WHO म्हणतं, भारतात तयार होणारी 'ही' औषधं मुलांना देऊ नका!

या कार्यक्रमात भाजप नेते अतुल भातखळकर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

Satyajeet Tambe News
Narendra Modi : आमचं भविष्य सर्वात जास्त धोक्यात; शिखर परिषदेत असं का म्हणाले PM मोदी?

'भाजप किंवा शिंदे गटात जाणार नाही'

सत्यजित तांबे पुढं म्हणाले, मी भाजप किंवा शिंदे गटात जाणार नाही. मात्र, त्यांना जर मला मदत करायची असेल तर ते करु शकतात. मला इकडं (काँग्रेसमध्ये) राहुनही ते संधी देऊ शकतील. 'ईडी'नं मदत करावी, अशी अपेक्षा आहे. म्हणजेच, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असं तांबे म्हणाले होते. आता पदवीधर निवडणुकीच्या निमित्तानं याची चर्चा होत आहे.

Satyajeet Tambe News
Balasaheb Patil : 'पुरोगामी महाराष्ट्रात असलं चालणार नाही, मुश्रीफ लवकरच ED ला उत्तर देतील'

'मी भाजप, शिवसेना आणि मनसेचा सुद्धा पाठिंबा मागणार'

मी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा असलो तरी काही तांत्रिक कारणामुळं मला पक्षाचा एबी फॉर्म वेळेत मिळू शकला नाही, त्यामुळं मी काँग्रेस आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच, मी या निवडणुकीत उभा असेल. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांना पाठिंबा मागणार आहे. अगदी भाजप, दोन्ही शिवसेना आणि मनसे यांना सुद्धा मी पाठिंबा मागणार आहे, असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय. त्यांच्या 'सरकारनामा'मधील मुलाखतीचीही चर्चा आता होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सत्यजित तांबे भाजपात जाणार अशीही चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com