
Graduate Election Result : तांबे-पाटील हाय व्होलटेज सामना, नाशिक पदवीधर मतमोजणीला वाहताहेत अफवांचे वारे
नाशिक : पदवीधर निवडणूकीत नाशिक विभागाची निवडणूक हाय व्होल्टेज ठरली. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारी पासून ते शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर त्यांना भेटण्याचा केलेला प्रयत्न. असा एकुण निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाल्यापासून ते मत मोजणीपर्यंत अधिक रंगतदार होताना दिसत आहे.
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले. विभागात 49.28 टक्के तर नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले.
आता सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (ता. २) मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 17 फेऱ्या होणार आहेत.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
17 फेऱ्यानंतर निकाल जाहीर होणार असला तरी अद्याप मात्र कोणत्याही फेरीची आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाहीये. तरिही मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु असून त्यांच्या जल्लोषामुळे काही माध्यमांमध्ये देखील आघाडी- पिछाडीच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.
सत्यजीत तांबेंच्या मुळ गावी म्हणजेच संगमनेरमध्ये तर निकाला आधिच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असून त्याचे बॅनरही झळकले आहे.
सायंकाळपर्यंत किमान निकालातील काही फेऱ्यांची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता असून अधिकृत निकालासाठी तरी उमेदवारांना रात्रीची वाट पाहवी लागू शकते. तोवर या अतिउत्साही कार्यकर्त्यांच करायचं काय असा प्रश्न उमेदवारांनाही सतावत राहील.