Nashik News : द्राक्षबागांना दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री थंडीचा कडाका; मण्यांना तडा

Nashik : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणी हंगाम वेगात सुरू आहे. खरड छाटणीला वेग आला आहे. रात्री कडाक्याच्या थंडीचा व दुपारी कडक उन्हाचा तडाख्यामुळे द्राक्षमणी तडकत आहेत.
grapes
grapesesakal

Nashik News : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणी हंगाम वेगात सुरू आहे. खरड छाटणीला वेग आला आहे. रात्री कडाक्याच्या थंडीचा व दुपारी कडक उन्हाचा तडाख्यामुळे द्राक्षमणी तडकत आहेत. शिवाय मणीगळही होत आहे. खरड छाटणीनंतर आलेला नवीन फुटवा कडक उन्हामुळे कोमेजून जात आहे. त्यामुळे नवीन पालवी फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे. (nashik grapes are cracking due to harsh cold marathi news)

द्राक्ष हंगाम मध्यावर आला आहे. गेल्या काही वर्षांत अडचणींचे अनंत डोंगर उभे राहिले. मेहनतीने पीक घेतले, पण भावाचा ठाव नाही. आता बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. दुपारी तळपणारा सूर्य आणि रात्री जीवघेणी थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीची धग जाणवायला लागली आहे. द्राक्ष छाटणी जोरात सुरू आहे.

मात्र, उन्हाची तीव्रता अधिक असल्याने छाटलेली द्राक्ष बाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. कोवळ्या द्राक्ष पानांना उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे झाडावरची पाने सुकून आपोआप जमिनीवर पडत आहेत. शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदा हंगामात द्राक्ष काडी तयार झाली नाही.

पुढील वर्षी द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेता येणार नाही. द्राक्ष बागेची फूट होण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर दिवसातून दोन वेळा पाणी स्प्रेद्ववारे फवारणी करावी. जेणेकरुन येणाऱ्या फुटेवर कुठलाही परीणाम होणार नाही व द्राक्ष फुटवणी मोठ्या प्रमाणात होईल.

grapes
Nashik News : राज राजेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात युरियाची फवारणी केल्यास द्राक्ष बागेस मोठ्या प्रमाणात योग्य फायदा होऊ शकतो व द्राक्ष बागेची काडी व फूट चांगली होऊ शकते. शक्यतो सकाळी किवा सायंकाळी ठिबक सिंचनने पाणी द्राक्षबागेला दिल्यास बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होऊन जास्तीत जास्त पाणी द्राक्ष बागेस मिळेल. द्राक्षबाग मोठ्या प्रमाणात अनुकुल वातावरण मिळेल.

''सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सगळीकडे उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे छाटलेली द्राक्ष बाग फुटण्यास मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जाव लागत आहे. यासाठी उपाययोजना म्हणून सकाळी व सायंकाळी ठिबम सिंचनाद्वारे पाणी देऊन बागेचे संगोपन करावे.''-बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनेवाडी बुद्रुक

''द्राक्ष हंगाम मध्यावर आहे. सर्वत्र द्राक्षमाल काढणी सुरू आहे. दिवसा कडाक्याचे ऊन आणि सकाळी, सायंकाळी थंडीचा परिणाम द्राक्षवेलीवर होत आहे. परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाऊ‌न नुकसान होत आहे.''-ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक (latest marathi news)

grapes
Nashik News : राज्यघटनेमुळेच देशात आज एकजूट : न्या. भूषण गवई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com