Simhastha Kumbh Mela : उज्जैन, हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकचा सिंहस्थ आराखडा : पालकमंत्री दादा भुसे

Simhastha Kumbh Mela : नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Melaesakal

Simhastha Kumbh Mela : मध्य प्रदेशातील उज्जैन व उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याची सखोल माहिती घेऊन नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडेही निधीची मागणी करण्यात येणार असल्याने नाशिकच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (nashik Simhastha Kumbh Mela plan marathi news)

नाशिक व त्र्यंबकेश्वरला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. पूर्वतयारीसाठी पालकमंत्री भुसे यांनी शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. नाशिक महापालिकेने ११ हजार कोटींचा, तर त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेतर्फे १६४ कोटींचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाची चांगली संधी उपलब्ध होणार असून, वाराणसीच्या धर्तीवर शाश्वत विकासकामांवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी दिले.

साधुग्राम, साधू-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, वीजव्यवस्था पुरविणे तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन, येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा पुरविणे, पार्किंग व्यवस्था, शहर विकास आदींबाबत करण्यात येणाऱ्या कामांसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळा मंत्र्यांना डावलून पालकमंत्र्यांचा सिंहस्थ आढावा

या वेळी आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा, अशी मागणी करीत सप्तश्रृंगगड विकास, त्र्यंबकेश्वर विकास, टाकेद तीर्थ विकासाची कामे सुचवली. कुंभमेळ्यासंदर्भात नाशिककरांच्याही सूचनांचा समावेश करण्यासाठी ‘ॲप’ तयार करण्यात येणार आहे.

त्यामुळे केवळ कुंभमेळ्यापर्यंत मर्यादित विचार न करता नाशिकमधील शक्तिस्थळे, श्रद्धास्थाने यांचाही विकास करण्याची सूचना त्यांनी केली. त्र्यंबकेश्वरसाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आराखडा मंजुरीस विलंब

सिंहस्थ कामांचे प्रस्ताव राज्य शासन व केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कुंभमेळा पाहता एप्रिल २०२७ मध्ये प्रस्तावित कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी संपत आला असून, अजूनही आराखडा अंतिम झालेला नाही. त्यामुळे मोठी कामे दोन वर्षांत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली.

Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना

अपेक्षित कामे

- साधुग्रामसाठी पंचवटीत ५०० एकर जागा आरक्षण

- साधुग्रामसाठी तीन हजार प्लॉटचे नियोजन

- पाच लाख साधू-महंत येण्याचा अंदाज

- प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याचा अंदाज

- ३५० किलोमीटरचे रस्ते बांधणार

- २१ नवे पूल बांधणार

- दोन किलोमीटरचे घाट प्रस्तावित

- जुन्या घाटांची दुरुस्ती करणार

- ९२४ दिशादर्शक फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार

- इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर, सिंहस्थ सुविधा केंद्र

- त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षभरात दोन कोटी भाविक येण्याचा अंदाज

- त्र्यंबकेश्‍वरमध्ये सुविधांचा अभाव असल्याची खंत

- दररोज २५ हजार भाविकांची वर्दळ (latest marathi news)

Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी फक्त 10 कोटीचे टोकन; मनपा निधीसाठी शासनावर अवलंबून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com