Guardian Minister Bhuse : आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळणार : पालकमंत्री दादा भुसे

Nashik : आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या सातबारावरील पोटखराब शब्द काढून जमीन लागवडीखाली आणल्याचा सातबारा दिल्यामुळे त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
Guardian Minister Dada Bhuse while distributing seven-twelve copies to the tribal brothers.
Guardian Minister Dada Bhuse while distributing seven-twelve copies to the tribal brothers.esakal
Updated on

मालेगाव : तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकरी बांधवांना ५० वर्षापासून शासनाने जमिनी दिल्या होत्या. परंतु त्या जमिनीच्या सातबारा उता-यावर पोटखराबा क्षेत्राची नोंद होती. आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या सातबारावरील पोटखराब शब्द काढून जमीन लागवडीखाली आणल्याचा सातबारा दिल्यामुळे त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Guardian Minister Bhuse)

श्री. भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील नांदगाव येथील ७८ आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या सातबारावरील पोटखराब शब्द काढून जमीन लागवडीखाली आणल्याचा सातबारा वाटप कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी नितीन सदगीर, प्रभारी तहसीलदार उमा ढेकळे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसवेक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की नांदगाव येथील आदिवासी शेतकरी बांधवाच्या जमिनीला ५० वर्षापासून सातबारा उतारा नव्हता. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पोटखराब वर्ग़ (अ) क्षेत्र सुधारणा करुन लागवडी योग्य केलेले आहे. त्या क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज, पिक विमा.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा मोबादला मिळता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. पिकाखाली असलेल्या पोटखराब क्षेत्रातील शेती उत्पादनाचा नियोजनाच्या कामात विचार केला जात नव्हता. तसेच, पोटखराब म्हणून नोंद असलेले क्षेत्र संबं‍धीतास यापूर्वी लागवडीखाली आणता येत होते. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse while distributing seven-twelve copies to the tribal brothers.
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

परंतू त्यावर महसुलाची आकारणी करता येत नव्हती. त्याअनुषंगाने आता पोटखराबाखाली येणारी जमीनधारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येणार असून, त्याची अतिरिक्त आकारणी करण्यात येणार आहे. सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र अशी नोंद झाल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.

या शेतकऱ्यांना वितरण

नांदगाव येथील मंदाबाई गायकवाड, रमेश सोनवणे, ताराचंद पवार, रामा सोमा भिल, अंजना सोनवणे, आकाश सोनवणे, पंढरीनाथ गायकवाड, द्वारकाबाई गायकवाड, दादाजी ठाकरे, गणपत भिल, लालचंद भिल, पांडुरंग भिल, विठोबा भिल, नामदेव भिल, सोमा भिल, सुरेश भिल, अनिल गायकवाड, देवबा भिल आदी लाभार्थ्याच्या जमिनीच्या सातबारा वरील पोटखराब शब्द काढून जमीन लागवडीखाली आणल्याचा सातबारा वाटप पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Guardian Minister Dada Bhuse while distributing seven-twelve copies to the tribal brothers.
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.