Nashik Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती मिरवणूक कडेकोट बंदोबस्तात

Nashik News : हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीसह सर्व मंदिरांलगत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
Nashik Hanuman Jayanti 2024
Nashik Hanuman Jayanti 2024esakal

Nashik Hanuman Jayanti 2024 : हनुमान जन्मोत्सवानिमित्त (Hanuman Jayanti 2024) शहरातून काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीसह सर्व मंदिरांलगत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिस अंमलदार, होमगार्ड यांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आले होते. जुने नाशिक, भद्रकाली, मेनरोड, पंचवटीत मिरवणुकीनिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. (Nashik Hanuman Jayanti 2024 procession news)

हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीला दुपारी चार वाजता वाकडी बारव येथून प्रारंभ झाला. वाकडी बारव येथून निघालेली मिरवणूक महात्मा फुले मंडई, दूधबाजार, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंटमार्गे एम. जी. रोडवरुन अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडकडून मार्गस्थ झाली. (latest marathi news)

Nashik Hanuman Jayanti 2024
Hanuman Jayanti 2024 : भारतातल्या या मंदिरात केली जाते श्री हनुमंतांची पत्नीसोबत पूजा, मंदिराचे महत्त्वही आहे खास

रामकुंड येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दरम्यान, सारडा सर्कल, वाकडी बारव, मौलाबाबा दर्गा, दूधबाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, तिवारी लेन, धुमाळ पॉइंटसह सर्व प्रमुख चौकांत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.

संवदेनशील ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते. जुने नाशिक परिसरात चार पोलिस निरीक्षकांसह सात सहायक व उपनिरीक्षक, ७१ अंमलदार, १३ महिला अंमलदार आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात होती.

Nashik Hanuman Jayanti 2024
Hanuman Jayanti 2024: अंजनीसुत हनुमानांनी सुर्याकडे झेप घेतली तो डोंगर पाहिलाय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com