Nashik Hasyarang Sahitya Sammelan : अशी हास्यरंग साहित्य संमेलन व्हावीत...

Nashik News : साहित्यातील पूर्वीचे लेखन ते सध्याचे विनोदी साहित्यावर बराच ऊहापोह झाला. त्यामुळे विनोदी साहित्य संमेलन व्हावीत आणि ही काळाची गरज बनली आहे.
Comedy
Comedyesakal

"दैनिकाचे पहिले पान उघडल्यावर बातमीपेक्षा पहिले लक्ष जाते ते कोपऱ्यातील व्यंग, विडंबन, विनोदाकडे. दोन-चार ओळीत कानपिचक्या काढणारे विनोद वाचकाला खाड्कन जाग करतात. त्या चित्रातून सत्य परिस्थिती मांडलेली असते म्हणून त्याचा आजही तेवढाच वाचक आहे म्हणूनच समाजात विनोदी साहित्य महत्त्वाचे आहे. याउलट करोडो रुपये खर्च केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जर विनोदी साहित्याला समाविष्ट करून घेतले तर, संमेलनात रिकाम्या खुर्च्या उरणार नाहीत. हे नुकत्याच दोन दिवस पार पडलेल्या हास्यरंग साहित्य संमेलनाला जमलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीवरून सहज लक्षात येईल. तेच- तेच घिसेपिटे भाषण, परिसंवाद, कविसंमेलन एकीकडे वक्ता व्यासपीठावर बोलतोय आणि प्रेक्षक मोबाईल बघतोय अशा संमेलनातून समाजाला काडीचा उपयोग होत नाही म्हणूनच मराठी साहित्य संमेलन कंटाळवाणे होतात." (Nashik Hasyarang Sahitya Sammelan marathi news)

चांगल्या हेतूने सोशल मीडियावर पोस्ट टाका. तिथे फुकटचे सल्ला देणारे, पोस्टमध्ये दोष काढणारे हमखास भेटतील. पोस्ट राजकारणावर असेल तर, नेत्यांआधी कार्यकर्ते आधी धावून येतील मग, कॉमेंटमध्ये शिवीगाळ, धमक्या, घरच्यांचा उद्धार, प्रोफाइल शोधून काढणे, ब्लॉक करणे यासारखे प्रकार घडतात. हल्ली लोकांच्या भावना इतक्या बोथट आणि अति संवेदनशील झाल्यामुळे विनोदाला विनोद म्हणून स्वीकारण्याची क्षमता कोणात राहिली नाही.

पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. विनोदाला हलक्यात घेतले जायचे. आता मात्र भावना दुखावल्या जातात. दोन दिवस रंगलेल्या हास्यरंग साहित्य संमेलनातून प्रेक्षकांना सकस विनोदी खाद्य मिळाले. साहित्यातील पूर्वीचे लेखन ते सध्याचे विनोदी साहित्यावर बराच ऊहापोह झाला. त्यामुळे विनोदी साहित्य संमेलन व्हावीत आणि ही काळाची गरज बनली आहे. (Latest Marathi News)

Comedy
New Educational Policy : शैक्षणिक धोरणाला संस्‍थांच्‍या उपक्रमांतून बळ...!

स्तुत्य उपक्रमांमुळे मराठी दिनाचे सार्थक

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दोन दिवसात ग्रंथोत्सवात १३०७ पुस्तक विक्रीतून १ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये १३ ग्रंथ वितरकांनी सहभाग घेतला होता. ही जमेची बाजू या ग्रंथोत्सवात बघायला मिळाली तर, सार्वजनिक वाचनालयाने कुसुमाग्रजांची महती विद्यार्थ्यांना कळावी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी दहा मिनिटांत कुसुमाग्रजांची माहिती देण्यासाठी लेखक, साहित्यिकांची निवड केली. त्याचबरोबर शाळांना कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कणा कवितेची फोटोफ्रेम भेट म्हणून देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाला शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला.

महासंस्कृती महोत्सव फ्लॉप

पाच दिवस महासंस्कृती महोत्सवाची भरगच्च अशी कार्यक्रमपत्रिका होती पण महोत्सव पूर्णतः फ्लॉप ठरला. दादासाहेब गायकवाड सभागृहात साउंड सिस्टिम, लाईट्स, विंग, नेपथ्य नाटकाला आवश्यक असणारी सुविधाच नसल्याने कलाकारांचा हिरमोड झाला.

शिवाय कार्यक्रम वेळेवर सुरू न होण्याच्या ‘संस्कृती’मुळे महोत्सवाला प्रेक्षक काही लाभले नाही. नाटकाची वेळ सायंकाळी पाचची असताना नाटक सात वाजता सुरू झाले तर कुठून मिळणार प्रेक्षक, कागदावर काहीतरी कार्यक्रम घेतल्याचे दाखवायचे म्हणून सांस्कृतिक महोत्सव अयशस्वी होण्यात आणखी एका महोत्सवाची भर पडली एवढंच. (Latest Marathi News)

Comedy
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 12 मार्चला नंदुरबारमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com